विषारी मावा विक्रेत्यांवर कारवाई करावी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी

 

अहमदनगर - विषारी माव्यामुळे तरुण पिढींचे भविष्य अंधकारमय होत चालले असून या विषारी माव्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने जिल्हाधिकारी  तसेच अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष साजिद हमिद खान, टीपू शेख, तौफीक सय्यद, फारुक शेख, सुलतान सय्यद, अदनान साबीर शेख, अमीर बागवान, कैसर महेबुब खान, सुमन काळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हंटले आहे की, शहरामध्ये उघडपणे विषारी मावा विक्री सुरु असून या विषारी माव्यावर तातडीने कारवाई करावी. या विषारी माव्यामुळे शहरात वर्षाला अनेकांना कॅन्सर होत असून अनेकांचा यामुळे मृत्यू होत आहे. अनेक व्यापरी माव्यामध्ये घातक द्रव्य घालत असून मावा कसा जास्तीत जास्त ट्रॉग होईल याचा मावा विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे.

माव्यामध्ये घातलेल्या त्या घातक ऍसिड व झडूबाम टाकल्याने तोंड सडून तोंडाचे कॅन्सर होत आहेत. त्यामुळे शहरामध्ये संपुर्ण माव्याच्या टपर्‍यावंर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.

तसेच नगरमध्ये अन्न व औषध प्रशासन कार्यालय असूनही त्यांनी आद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्या अधिकार्‍यांना मावा विक्रेत्यांकडून चिरीमिरी मिळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. भविष्यामध्ये भावी पिढी वाचवायची असेल तर मावा विक्रेत्यांवर प्राशासनाने कारवाई करावी, तरच होणारी हाणी थांबणार आहे. प्रशानाने ठोस पावले उचलली नाही तर भविष्यात आरपीआयच्या वतीने अशा व्यापार्‍यांवर कठोर कारवाईचा बगडा उचलाव लागेल त्यास प्रशासन जबाबदार राहिल असा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!