महिलांच्या सुरक्षेसाठी ‘शक्ती कायदा’ लवकरात लवकर मंजुर करावा

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन

अहमदनगर - महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार या विरोधातील शक्ती कायदा अद्याप रेंगाळत आहे तसेच महिला आयोगास अध्यक्ष नेमण्यात यावा, या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जिल्हाध्यक्ष संपुर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्षा संपुर्णा सावंत व पदाधिकारी उपस्थित होत्या.


जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रात आज रोजी महिलांवर मोठ्या प्रमाणावत अत्याचार होत असून, दररोज वृत्तपत्रांतील महिलांवरील, अल्पवयीन मुलींवर होणार्या 365 दिवस अत्याचाराच्या बातम्या ऐकून मन सुन्न होते. अशा परिस्थितीत शासना कडून स्त्री संरक्षणार्थ कडक उपाययोजना करणे अपेक्षित असतांना प्रलंबित असलेला शक्ती कायदा देखील मंजूर होत नाही, हा महाराष्ट्रातील महिलांवर एकप्रकारे शासनाकडून होत असलेला अन्यायच आहे. 


त्याचप्रमाणे महिलांवर होणार्या अन्याय अत्याचार या विरोधात महिलांना दाद मागण्याकरीता महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तथापि महिला आयोगाचे अध्यक्ष पदच रिक्त असल्याने महिलांनी दाद कुठे मागायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्कृतीचा वारसा असलेल्या आपल्या भारत देशामध्ये दिवाळी हा मोठ सण असून, या उत्सवात लक्ष्मीपूजन केले जाते. रक्षाबंधन, महिला दिन यासारखे महिलांचा सन्मान करणारे दिन साजरे होतात. तरीही महिलांवर अत्याचार होतात, ही सर्वांसाठी लाजीरवाणी बाब आहे. तरी शासनाने लवकरात लवकर शक्ती कायदा मंजूर करावा तसेच महिला आयोगाचे अध्यक्षांची नेमणुक करावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!