पी.ए.इनामदार शाळेतील स्वागताने विद्यार्थी भारावले

पी.ए.इनामदार शाळेतील स्वागताने विद्यार्थी भारावले

नगर -गेल्य अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा शासनाच्या आदेशाने सुरु करण्यात आल्या. यामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गोविंदपुरा येथील पी.ए.इनामदार शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. शाळेने केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले. याप्रसंगी मुख्याध्यापक हारुन खान, उपमुख्याध्यापिका सौ.फरहाना शेख, संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर, व्हाईस चेअरमन इकबाल सय्यद, सचिव डॉ.खालीद शेख, ट्रेझरर विकार काझी, पालक संघाचे सदस्य हाजी सादिक सय्यद, अलाउद्दीन शेख, शेख अ.कदीर अय्युब,हाजी फारुक शेख, शेख अशफाक सर, शेख फैरोज, हाजी शेख जमीर, इशरत शेख, परवेज शेख आदि उपस्थित होते.

याप्रसंगी चेअरमन अब्दुल रहीम खोकर म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळजवळ दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या, आता कोरोनाचे संकट दूर होत असतांना शासनाने शाळा पुन्हा सुरु केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकविले जाणार आहे. बंद काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या सहकार्याने ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. याही माध्यमाचा विद्यार्थी-पालक यांनी लाभ घेऊन विद्यार्थ्यांची प्रगती साधली असल्याचे सांगितले.

मुख्याध्यापक हारुन खान म्हणाले, शासनाच्या निर्देशाप्रमाणे शाळाचे संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्याच बरोबर शैक्षणिक सत्राचेही नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पालक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले. शेवटी सौ.फरहाना शेख यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!