मखदूम सोसायटीच्या कौमी एकता सप्ताह हा कौतुकास्पद उपक्रम - शौकत तांबोली
एक कमजोर से धागे ने बताया है कमर....भाई बहनों की हिफाजत के लिए होते है
अहमदनगर- देशाच्या भवितव्यासंबंधी असणारे शुभचिंतक आणि विवेकशील लोकांना प्रखरतेने याची जाणीव झाली आहे की आमचं प्रिय भारत देश यावेळी अनेक समस्यांनी होरपळून निघत आहे. त्याला काळजी वाटते की वेडीच या विद्वेषी प्रवृत्तीला प्रतिबंध घातलं नाही तर परिस्थिती फारच चिंतनीय होऊ शकते. यापासून देशवासीयांना वाचविण्यासाठी मखदूम सोसायटीच्या वतीने कौमी एकता सप्ताह हा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असाच आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत भाई तांबोली यांनी केले.मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, मराठा सेवासंघ व रहमत सुलतान फाउंडेशन च्या वतीने कौमी एकता सप्ताह अंतर्गत रहमत सुलतान हॉल येथे सदभावनेसाठी महेफिले मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोली यांच्या हस्ते मुशायरयाचे दीप प्रज्वलन करण्यात आले.
औरंगाबाद येथील प्रसिद्ध शायर कवी लेखक मिर्झा असलम बेग यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष के के खान, चांद सुलताना हायस्कूल चे माजी प्राचार्य कादिर सर उपस्थित होते. यावेळी मखदूम सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सुरूर, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील, सचिव निसार बागवान, आबीद दुलेखान, आसिफ सर आदी उपस्थित होते.
मुशायरयाची सुरुवात कुरण पठणाने करण्यात आली. यानंतर नफीसा हया यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण करताना म्हणाले की युसूफ का कौन है वो खरीदार देखकर, मै आ रही हू मिस्र का बाजार देखकर या नाजुक शैलीच्या कवितेने रसिकांची भरभरून दाद मिळविले. याच वातावरणाला पुढे नेत आसिफ सर म्हणाले की..या खुदा अब तो मुंसीफी भी खो गयी, झुट तो सच के बराबर आ गया या कवितेने रसिकांची वाह वाही घेतली.
मुशायरयाची सुरुवात कुरण पठणाने करण्यात आली. यानंतर नफीसा हया यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण करताना म्हणाले की युसूफ का कौन है वो खरीदार देखकर, मै आ रही हू मिस्र का बाजार देखकर या नाजुक शैलीच्या कवितेने रसिकांची भरभरून दाद मिळविले. याच वातावरणाला पुढे नेत आसिफ सर म्हणाले की..या खुदा अब तो मुंसीफी भी खो गयी, झुट तो सच के बराबर आ गया या कवितेने रसिकांची वाह वाही घेतली.
या परिस्थितीत मुशायऱ्याला याच वातावरणात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी एक अनुभवी कवी सय्यद खालील यांनी पार पडताना म्हणाले... आस्तीं खलील तुम झटक भी चुके, कितने सांप आस पास है अभी या शायरीने रसिकांच्या टाळ्यांनी हाॅल गुंजत होता. याला पुढे नेताना बिलाल अहमदनगरी यांनी मांडले की.. बुढापे मे हमारे कदम डगम गाये, कोई समजा के हम पी कर आये या सत्यावर आधारित कवितेने लोकांची वाहवाई मिळविली. यानंतर कमर सुरूर यांनी आपल्या रचना सादर करताना म्हणाले की.. ईद होली हो दिवाली हो या रक्षाबंधन, सारे तहवार मोहब्बत के लिये होते है, एक कमजोर से धागे ने बताया है कमर, भाई बहनों की हिफाजत के लिए होते है.
या राष्ट्रीय एकात्मता व भाऊ बहिणीच्या नात्यावरच्या कवितेने रसिक एकदम मंत्रमुग्ध झाले. मुंबई येथील कवी शहजान वसीम म्हणाले की उसके आने से मेरी हर बात झूट हो गई, मेरा तो पता नही मगर वो बदनाम हो गई या कवितेने ही रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुशायराचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष असलम मिर्झा यांनी आपली कविता सादर करताना म्हणाले की.. मैने चंद अल्फाज क्या लिखे तेरी तारीफ मे,अब गले पड जायेंगे सारे के सारे देखना या कवितेने मुशायारयाचे गोड व प्रेमळ समारोप झाला.
याव्यतिरिक्त मुशायऱ्यामध्ये अशफाक शेख, सुलेमान अहमदनगरी, अर्क अहमदनगरी, सलीम यावर, शरीफ खान, मुन्नवर हुसैन यांनीही आपल्या एकापेक्षा एक चढावळ कविता सादर करून मुशायऱ्यामध्ये वाह वाह मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद खलील यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. कमर सुरुर यांनी केले. आभार निसार बागवान यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, मुस्कान फाउंडेशन, अलकरम सोसायटी, मराठा सेवासंघाचे सर्व सदस्यांनी व युनुस तांबटकर, तन्वीर चष्मावाला, आरिफ सय्यद, शफकत सय्यद, राजु शेख, एफ एन ब्रदर्स, अयाज गफुर, जावेद तांबोळी, जावेद मास्टर आदींनी परिश्रम घेतले.

