मख़दुम सोसायटी तर्फे मौलाना आझाद जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा

मख़दुम सोसायटी तर्फे मौलाना आझाद जयंती निमित्त चित्रकला स्पर्धा 

अहमदनगर - स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्या वतीने कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील जिल्हा परिषद व मनपाच्या शाळांमध्ये प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे उद्घाटन मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत करण्यात आले.

Makhdoom Society concludes painting competition on the occasion of Maulana Azad Jayanti

याप्रसंगी मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दूल्हेखान, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, असलम पटेल, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खालील, सचिव निसार बागवान, इंजि. अभिजित एकनाथ वाघ आदी उपस्थित होते. या स्पर्धा आलमगीर येथील सरसय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा, केडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत, फकीरवाडा व दर्गा दायरा येथील जिल्हा परिषद शाळेत, भिंगार छावणी परिषदेच्या महात्मा गांधी उर्दू शाळेत या सेंटरवर स्पर्धा पार पडल्या.


यासाठी सय्यद नौशाद, अंजूम शेख, नाजनीन शेख, शिरीन शेख, मुबीना बाजी, अफशा बाजी, आसमा शेख, जबीन इनामदार यांचे सहकार्य मिळाले. या स्पर्धेत पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तीन गटात विभागून स्पर्धा घेण्यात आली. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे आऊटलाईन केलेल्या चित्रामध्ये विद्यार्थ्यांनी फार उत्साहाने व आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळे कलर करून त्या चित्राला रंगवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेबद्दल मोठा उत्साह होता. छोट्या छोट्या शाळांमध्ये प्रत्येक वर्षी मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धा बद्दल शिक्षकांनी मखदूम सोसायटी व मराठा सेवा संघाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!