कष्टाचे फळ नेहमी मिळतातच - खासदार निलेश लंके

कष्टाचे फळ नेहमी मिळतातच - खासदार निलेश लंके

इस्लामी भेटवस्तूचे अहमदनगर मधील एकमेव नाज कलेक्शनचे उद्घाटन संपन्न


नगर- कोणताही व्यवसाय असो त्यासाठी सातत्य व कष्टाची अत्यंत आवश्यकता आहे. मन लावून कष्ट केल्यास यश नक्कीच प्राप्त होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाज कलेक्शन आहे. त्यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय आज त्यांच्या कष्टामुळे जिल्ह्यात नावाजलेला एकमेव दुकान झालेला असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.

Nilesh Lanke, Rathod, Election 2025



तख्तीदरवाजा येथील नाज़ कलेक्शन दालनाचे नुतनीकरण आई साहेब श्रीमती सलिमाबी सय्यद यांच्या हस्ते करन्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके बोलत होते.यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, हाजी करीम सेठ हुंडेकरी, हाजी शौकत तांबोली, विक्रम अनिल भैय्या राठोड, अशोक कानाडे, तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलिल, भाजपाचे अलाउद्दीन काझी, डॉ इस्लाम शेख, हाजी फारूक कमाल,भरत सूपेकर, शाहनवाज खान (टाईगर), एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, हाजी लियाकत हुसैन नजर हुसैन, सलिम खान गुलाब खान (सामाजिक कार्यकर्ता), पवन फिरोदिया, सुफी संगित सम्राट पवन श्रीकांत नाईक, राजु जाहगीरदार (खादीम मिरावली बाबा पहाड़), अनंत राव गारदे, सय्यद अजहर (अज्जू मेंबर), अब्दुल कादिर शेख,कासिम शेख, मोहम्मद हुसैन शेख, गुलाम मोहम्मद (पप्पू पटेल), अजंर अनवर खान, अजिम राजे, नदीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की आज धार्मिक स्थळांना लोक मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात व तेथून आपल्या मित्र मंडळांना भेट देण्यासाठी भेटवस्तू आणत असतात. पण साधारण सर्वांना ते देऊ शकत नाही अशावेळी नाज कलेक्शनने सर्वसामान्य लोकांसाठी त्या भेटवस्तू आपल्या दालनात उपलब्ध करून दिले आहे ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या गोष्टीचा सर्वसाधारण लोकांना नक्कीच फायदा होईल असे त्यांनी सांगितले.


अशा या आगळ्यावेगळ्या चांगल्या प्रकारचे दर्जेदार वस्तू मिळण्याचे दुकान अहमदनगर सारख्या ठिकाणी सुरु केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी संचालक सय्यद अन्सार यांचे भरभरून कौतुक केले.
संचालक सय्यद अंन्सार मोहम्मद शफी कादरी,सय्यद मुस्तफा अंन्सार, सय्यद अहमद अंन्सार, सय्यद अली अंन्सार आदिंनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख नासिर हाजी हाफीजुद्दीन, सैय्यद इब्राहिम, शरीफ खान, सकलैन रिजवान, सैय्यद असीम सादीक, समीर इब्राहिम शेख, अमजद शेख, अरबाज पठाण, बासीत शेख, फैरोज शेख दौंडवाले, परवेज शेख, रिजवान दिलावर खान आदिंनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.