भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांत शिवछत्रपतींच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करावा - आसिफ खान

भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांत शिवछत्रपतींच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करावा - आसिफ खान

bhuikot


नगर - गेल्या काही दिवस शहरातील वर्तमानपत्रात अहमदनगरच्या भुईकोट किल्ला विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला, असे वाचण्यात आले. त्यात नेताकक्ष व इतर काही विकासाची कामे करणार असे समजले.



अहमदनगरच्या भुईकोट किल्यात स्वराज्य महाराणी येसुबाई, छत्रपती संभाजी महाराजपुत्र छत्रपती शाहू हे, तर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांचे वडील चौथे छत्रपती शिवाजी महाराज हे ब्रिटीशांनी कैदेत ठेवले होते. याच ठिकाणी चौथे शिवाजी महाराजांची हत्या झालेली आहे. या वास्तूंचासुध्दा विकासकामात समावेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यांनी केली आहे.



शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा पुसून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून पर्यटक अहमदनगरला येतील. शिवरायांच्या वंशजांचा इतिहास जाज्वल्य आहे. आपण अहमदनगरकरांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा विचार करून विकासात्मक कामात या गोष्टींचा समावेश करावा, हि मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कडे केली आहे. यावेळी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आदि उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!