सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत महात्मा फुलेंना अभिवादन

सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत महात्मा फुलेंना अभिवादन

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य महत्वपूर्ण - डॉ. प्रा.सलाम सर

savitribai phule school


नगर - महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठीच्या शाळांबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केली होती, त्यांचे शैक्षणिक कार्य महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मोहम्मदीया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ. अब्दुस सलाम सर यांनी केले.


महात्मा ज्योतीबा फुले यांची १९८ वी जयंती सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा येथे संपन्न झाली. त्याप्रसंगी विद्यार्तीनीना मार्गदर्शन करताना सलाम सर बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, असलम पटेल, यास्मिन शेख, फरजाना शेख, शाहीन शेख, काझी मुमताज, शेख सुलताना, शेख हीना सह विद्यार्थीनी, पालक उपस्थित होते.


नौशाद सैय्यद म्हणाले की, बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ. स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली.


महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले. तर आभार काझी मुमताज यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!