डेंग्यूवर उपाययोजना...

पावसाळ्यात होणार्‍या साथींच्या आजारामध्ये डेंग्यूचा ताप हा सर्वात धोकादायक व जीवघेणा आजार आहे. सर्वात मोठं कारण या तापात रुग्णांच्या बॉडीतील
पांढर्‍यापेशी खूपच प्रचंड प्रमाणात कमी होण्यास सुरु होतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खुप मोठी मदत होत असते. डेंग्यूवर योग्य उपचार व भरपूर प्रमाणात विश्रांती व चांगले आहार या गोष्टी अत्यंत महत्वाचे असते. डेंग्यूचा प्रसार करणार डास पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय यावर नियंत्रण ठेवले व सोपे असते.

डेंग्यू डासांमुळे व त्या विषाणूंमुळे होणारे डेंग्यू हे आजार आहे. विषाणूचे संक्रमण एडिस या डासाची मादीमुळे होते. लक्षणांमध्ये डेंग्यू हा चिकणगुन्या आणि ओ-न्यांग या विषाणूंमुळे होणार्‍या तापाशी साम्य असते. या आजारा विषयी अवलोकन केल्यावर डेंग्यूचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. डेंग्यू हा आजार संपूर्ण जगात थैमान घालतो असे निर्दशानात आले आहे. बर्‍याच देशात या आजारामुळे होणारे उद्रेकांचा व मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणावर समोर आले.

डेंग्यू डासांचे विषाणूचे डेन 1 ते 4 या उपप्रकारापैकी डेन-1 व 2 प्रकार अधिक प्रमाणात घातक आहे.
 

* डेंग्यू विषाणूची वाढ 8 ते 10 दिवसांत होते. या डासाच्या 

* पायावर पांढरे पट्टे असल्यामुळे त्यांना टायगर मॉस्क्यूटो म्हणतात.

* दिवसा चावतात
 * या डासांची उत्पत्ती साठवलेले पाणी, कुलरमधील पाणी, पॉट, पडून असलेल्या वस्तू, करवंट्या, टायर्स व डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या व बाटल्यां. पाण्याचे उघडे साठे यामध्ये होत असते.

लक्षणे -
* लक्षणे 3 ते 10 दिवसांनाी दिसते.
* ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड, तहान लागणे, ताप खालीवर होणे, पूरळ येणे.
* मृत्यूचे प्रमाण कमी असते.
* त्वचेखाली व नाकातून रक्तस्त्राव होणे.
* पोटात दुखुन शौचास जाणे.
* रुग्ण कदाचित बेशुद्ध होते यास डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हंटले जाते.

निदान -

* निदान करण्यासाठी रुग्णांचे रक्त दिले जाते.
* खाजगी व शासकीय प्रयोगशाळेत रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट मार्फत केली जाते.

उपचार-
* डास चावू नये म्हणून खोबरेचे तेल हे पायाला लावणे, हा डास जास्त उंच उडू शकत नाही. असे सोशल मिडीयात पोस्ट आहे. 

* योग्य आणि वेळेत उपचार मिळणे.
* वैद्यकीय मार्गदर्शनाखाली पॅरासिटॅमोल गोळ्यांची योग्य मात्रा वयोगटानुसार दिले जाते.
* रुग्णाला पूर्ण विश्रांती द्यावे.
* जास्त असेल तर दवाखान्यात दाखल करावे.
* डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे उपचारात आणावे.
* डेंग्यूचा प्रसार करणार्‍या या डासांची पैदास रोखणे हाच महत्वाचा उपाय.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!