प्रभाग क्रमांक 8 मधील व्यंकटेश कॉलनी येथे माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध व कायमस्वरूपी चे विकास करणे मार्गी लावली - माजी सभागृह नेते अशोक बडे
नगर : नव्याने विकसित होणारा आणि शहरापासून व विकासापासून दूर असणारा नागापूर बोल्हेगावाला विकास कामातून शहरीकरणाचे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे, मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लावली असल्यामुळे आता ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, व्यंकटेश कॉलनी मधील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे हाती घेतली आहे, विकासाच्या कामाबरोबरच आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर रहावा यासाठी डस्टबीनचे वाटप करण्यात आले होते, तसेच प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत कापडी पिशवी नागरिकांना देण्यात आली त्या माध्यमातून जनजागृती केली आहे एमआयडीसीमध्ये काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या भागामध्ये राहत असून त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी केले.
प्रभाग क्रमांक 8 मधील व्यंकटेश कॉलनी येथे माजी सभागृह नेते अशोक बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी बाबूशेठ नागरगोजे, राजू भोस, योगेश निकम, मोतीलाल मडकर, आदिकराव डुचे, रमेश सुरासे, अशोक उधारे, धनंजय आरे, संदीप सुरासे, बशीर मुलानी, अभिनय मडकर, रामहरी तांबे, रावसाहेब पुंड, प्रविण जाधव, नितु तिवारी, कविता भोसले, प्रिया निकम, सुवर्णा मरकड, ज्योती सावंत, ज्योती भोस, सिमा आरे, शकुंतला शेंडे, सिताबाई पुंड, सविता उधारे, भाऊसाहेब खेडकर, कुंडलिक कातोरे, बाळासाहेब बडे, सुनिल खामनेकर, केशव नागरगोजे, शेषराव बडे, अंकुश बडे, वामन आडकर, दिलीप पेटकर, अशोक धायतडक, अशोक घोडके, दराडे सर, बबलू फुंदे, कमलबाई बडे, शहाबाई नागरगोजे, कौशल्याबाई नागरगोजे, मिना नाकाडे, कोमल बडे, ज्योती बडे, रोहिणी बडे, उषा बडे, कालिका बडे, प्रियंका बडे, वैशाली बडे, अश्विनी नागरगोजे आदी उपस्थित होते.
रमेश सुरासे म्हणाले की, व्यंकटेश कॉलनी येथे आम्ही कॉलनी मधील रहिवासी राहण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी कुठल्याही विकासाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या मात्र मा.सभागृह नेते अशोक बडे यांनी टप्प्याटप्प्याने मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर होता तो सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, आणि आम्हाला फेज टू पाणी योजनेद्वारे पाणी दिले, याचबरोबर रस्ता डांबरीकरणाचे काम देखील मार्गी लावले, लाईटचा प्रश्न देखील सोडविला, फोन केल्यानंतर तातडीने प्रश्न मार्गी लागतो असे ते म्हणाले.
यावेळी व्यंकटेश कॉलनी मधील नागरिकांनी विकास कामाचे स्वागत केले व आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे सांगितले. तसेच उद्योजक बापूशेठ नागरगोजे यांनी सांगितले की उर्वरित प्रश्न पुढील काळात मार्गे लावले जातील असे ते म्हणाले

