मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत शिक्षक दिन साजरा
सलिम सरांचे कार्य उर्दूच्या प्रचार व प्रसारात मैलाचा दगड ठरेल - डॉ.प्रा.सलाम सरमोहंमदिया एज्युकेशन सोसायटी व अलफला एज्युकेशन सोसाटीच्यावतीने जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सलिमखान पठाण यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर, मोहंमदभाई अत्तार, आबीद दुलेखान, बाबासाहेब बोडखे, मुख्याध्यापक जमीर शेख, नौशाद सय्यद, अलिम शेख, तौसिफ शेख, हसिब शेख आदि.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारा असतो, त्यामुळे शिक्षकांची समाजात महत्वाची भुमिका आहे. शिकविण्याबरोबरच विद्यार्थीच्या भौतिक परिस्थिती आणि अंगभुत गुणांचा अभ्यास करुन त्यांना प्रोत्साहित करणे हेही शिक्षकांने काम केल्यास विद्यार्थीही विविध क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे श्रेय हे पालकांबरोबरच शिक्षकाला सर्वात जास्त मिळत असते. आणि हेच कार्य सलीमखान पठाण करत आहेत. नियमित शिकविण्याबरोबर विद्यार्थीच्या आवश्यक गरजा ओळखून त्या उपलब्ध करुन देऊन त्यांचा सर्वांगिण विकास साधत आहे. उर्दू शाळांची संख्या कमी होत असतांना त्यांनी स्वत:च्या शाळेला आदर्शवत शाळा बनवून जिल्ह्यातील इतरही उर्दू शाळांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत आहेत. त्यांचे हे कार्य उर्दूच्या प्रचार व प्रसारात मैलाचा दगड ठरेल, असे गौरोद्गार मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांनी काढले
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी व अलफलाह एज्युकेशन सोसाटीच्या सर्व शाखांच्या शिक्षकांच्यावतीने अरुणा आसिफ अली सामाजिक संस्थेतर्फे मौलाना आझाद हायस्कूल येथे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन व मनपा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सलिमखान पठाण यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर, माजी जि.प.सदस्य मोहंमदभाई अत्तार, उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान, माध्यमिक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, डि.एड्. कॉलेजच्या प्रा.अकिला शेख, फातेमा बाजी, फरिदाभाभी शेख, मुख्याध्यापक जमीर शेख, नौशाद सय्यद, फरहाना शेख, शिक्षण विस्तार अधिकारी अलिम शेख, तौसिफ शेख, हसिब शेख आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना सलिमखान पठाण म्हणाले, शिक्षकीपेशा ही नोकरी नसून ती एक जबाबदारी आहे. एक सृजनशिल समाज घडविण्याचे काम शिक्षकांवर आहे, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने पगारापुरते काम न करता त्या पलिकडे जाऊन शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण कसे मिळेल हे पाहिले पाहिजे. नियमांचा बाऊ न करता त्या पलिकडे जाऊन विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास साधला पाहिजे. सूत्रसंचालन निशात खान यांनी केले तर आभार तलमिज सर यांनी मानले.


thanks
ReplyDelete