बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा....

बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा....


पोळा म्हंटले की शेतकर्‍यांचे बैलांचा सण हा महाराष्ट्रात सर्वत्र खेड्यांपाड्यांमध्ये श्रावण अमावस्या आणि भाद्रपद अमावास्या या तिथीलानुसार साजरा उत्साहात साजरा केला जातो. या सणा द्वारे वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांना कृतज्ञता व्यक्त म्हणून हा एक मराठी सण आहे यात सर्व समाजाचे धर्माचे लोक हा उत्सव साजरा करतात. विशेषत  विदर्भात मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात साजरा केला जातो. 


गावात वेशीच्या ठिकाणी एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जातात. ढोल, ताशे किंवा डफ वाजवत एकत्र आणल्या जातात. गावात पोळा भरल्या जातो, दरगा किंवा मंदिर चे ठिकाणी जमा होतात व दुसरे ठिकाण सुध्दा निश्‍चित केले जाते, गावातील मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचा नारळ फोडल्या जातो. जो बैल जोडी किंवा बैल जिंकतो त्याला बक्षिस दिले जाते.

या सणाच्या दिवशी बांधव पुरणपोळ्यांचे जेवण बनवतात, बैलांना गहु, ज्वारी, बाजरी चा नैवद्य देतात, त्यांच्या पायावर पाणीचा शिंपडाव करतात व त्यांना ओवळतात. ज्या शेतकर्‍यांकडे शेती किंवा बैल जोडी नाही ते ट्रक्टरनी शेतीचे कामे करतात ते मातीच्या बैलांची पूजा किंवा उत्सव साजरा करतात. बैलाची निगा राखणार्‍या घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

 
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो. त्या अगोदर बैलांना आवतण केले जाते. त्यांना आंघोळ, चरायला घालते जाते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तेलाने चोळून शेक दिले जाते. आकर्षक रंगाने सजविण्यात येते. बैलांच्या अंगावर अनेक प्रकारचे घोषणा किंवा घोष वाक्य लिहले जाते. नक्षीकाम केली जाते, पाठीवर घालायची शाल किंवा झुल टाकले जाते, अंगावर गेरूचे ठिपके आणि अनेक वेगवेगळ्या रंगाचा वापर करुन सजवले जाते. शिंगांना बेगड व डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगरांच्या माळा, नवे वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले जाते. आपला बैल जोडी सगळ्या पेक्षा चांगली व उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या हिशोबाने साजशृंगार करतात.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!