'घरपट्टी माफी' मिळविण्याचे अर्ज वाटप, कायदा प्रबोधन समर्थनार्थ सह्यांच्या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; हिंदु मुस्लिम नागरिकांचा एकजुटीने सहभाग !

अहमदनगर - येथील शहर विकास समितीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९ च्या 'कलम १३३-अ' नुसार संवैधानिक हक्काच्या असलेल्या कोरोना 'नैसर्गिक आपत्ती' काळातील 'घरपट्टी पाणीपट्टी माफी' मिळावी यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासुन 'जन आंदोलन' सुरू केलेले आहे. मनपा प्रशासन आणि पदाधिकारी दि.१२ ऑगस्ट च्या विशेष सर्वसाधारण सभेत तीनपट घरपट्टी वाढीचा विषय खर्चासह मंजुरीसाठी ठेवला होता. शहर सुधार समितीने तिनपट घरपट्टी वाढीस मवपा समोर आंदोलन करत तातडीने विरोध केला त्यामुळे तीनपट घरपट्टी वाढ झाली नाही. नागरिकांच्या 'कलम १३३-अ' या हक्कासाठी मनपा पदाधिकारी आणि नगरसेवकांना मागणीपत्र दिले जात आहेत. शहर सुधार समितीबरोबरच भारतीस कन्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, चितळेरोड हॉकर्स युनियन, सिटू, ऑल इंडिया युथ फेडरेशन, पीस फौंडेशन, ऊर्जिता सोशल फौंडेशन, रहेमत सुलतान फौंडेशन, आयटक, आम आदमी पार्टी, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोशिएशन, छावा, शिव राष्ट्र सेना या समविचारी पक्ष संघटनांनी महापौरांना कायद्याच्या अंमलबजावणी साठी आणि विशेष सभा बोलावुन ठराव मंजुर करण्यासाठी मागणीपत्र दिले आहेत. काही जाणत्या नगरसेवकांचा नागरिकांच्या 'घरपट्टी पाणीपट्टी माफी' च्या या हक्कासाठी पाठिंबा आहे, परंतु पक्ष पदाधिकारी यांनी 'जनहिताच्या ठरावा'साठी अद्याप संमती दिलेली दिसत नाही. त्यामुळे ते उघडपणे जनतेसोबत यायला तयार नाहीत. फक्त सोनाली अजय चितळे या एकमेव नगरसेविका यांनी महापौर रोहिणी संजय शेंडगे यांना 'कायदा अंमलबजावणी' साठी मागणीपत्र दिलेले आहे. मिनाभाभी संजय चोपडा, प्रशांत गायकवाड यांनी या जनहिताच्या मागणीसाठी पाठींबा दिला परंतु अद्याप तसे पत्र महापौर यांनी दिलेले नाही. शहरात या कायद्याबाबत विविध माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे. विविध भागात कायद्याच्या माहितीची पत्रके वाटणे, नागरिकांच्या प्रभाग बैठका घेऊन कायद्याचा प्रसार व हक्काचे प्रबोधन करणे आदी मोहिम सुरू आहे.


काल दि.११ रोजी शहर सुधार समिती आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने दिल्लीगेट येथे घरपट्टी माफी अर्ज वाटप, कायदा प्रबोधन आणि सह्यांची मोहिम आयोजित केलेली होती. या मोहिमेस शहरातील हिंदु मुस्लिम नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. एकूण १०० पेक्षा जास्त नागरिकांनी माफी अर्ज घेऊन गेले असून लवकरच ते महापौर व आयुक्तांना सादर केले जाणार आहेत. यापुढे शहरातील विविध प्रभागात 'घरपट्टी माफी अर्ज' वाटप व समर्थनार्थ सह्यांची मोहिम घेतली जाणार आहे.


या व्यापक नागरी हिताच्या मोहिमेस पाठिंबा देण्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यसहसचिव अॅड.कॉ.सुभाष लांडे, अ.भा.किसान सभेचे अॅड.कॉ.बन्सी सातपुते, कामगार संघटना महासंघाचे महादेव पालवे, छावा संघटनेच्या प्रमुख सुरेखाताई सांगळे, दत्ता वामन, संदीप दातरंगे, दिपकराव कावळे, राष्ट्र सेवा दलाचे विवेक पवार, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर आदी उपस्थित होते.


हि व्यापक नागरी हिताची मोहिम यशस्वी होण्यासाठी शहर सुधार समिती आणि समविचारी पक्ष संघटनांचे संजय झिंजे, महेबुब सय्यद, रामदास वागस्कर, सुचिता शेळके, नलिनी गायकवाड, फिरोज शेख, दिपक शिरसाठ, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, अमोल पळसकर, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, तुषार सोनवणे, अरूण थिटे, संपतराव रोहोकले, अरूण खिची, शकूर शेख, रावसाहेब कर्पे, दिलीप घुले, संपत मोरे, सुहास मार्डीकर, अश्विन शेळके, नानासाहेब खरात, प्रशांत चांदगुडे, आसाराम भगत, वैभव कदम, सुनिल ठाकरे, संजय शेकडे, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आदी प्रयत्नशिल आहेत.

घरपट्टी माफी' मिळविण्याचे अर्ज वाटप, कायदा प्रबोधन समर्थनार्थ सह्यांच्या मोहिमेत सहभागी संजय झिंजे, महेबुब सय्यद, युनुस तांबटकर, रामदास वागस्कर, सुचिता शेळके, नलिनी गायकवाड, फिरोज शेख, दिपक शिरसाठ, दत्ताभाऊ वडवणीकर, संतोष गायकवाड, अमोल पळसकर, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, तुषार सोनवणे, अरूण थिटे, संपतराव रोहोकले, अरूण खिची, शकूर शेख, रावसाहेब कर्पे, दिलीप घुले, संपत मोरे, सुहास मार्डीकर, अश्विन शेळके, नानासाहेब खरात, प्रशांत चांदगुडे, आसाराम भगत, वैभव कदम, सुनिल ठाकरे, संजय शेकडे, अॅड.कॉ.सुभाष लांडे, अॅड.कॉ.बन्सी सातपुते, महादेव पालवे, सुरेखाताई सांगळे, दत्ता वामन, संदीप दातरंगे, दिपकराव कावळे, विवेक पवार, दिपक खेडकर, कॉम्रेड भैरवनाथ वाकळे आदी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!