नगर - या जगाशी भांडण्याचा फंद घ्यावा लागतो... पोळतांना हसण्याचा छंद घ्यावा लागतो... बोलते कविता जराशी.... मौन मंग सोडूनिया... अक्षरांना वेदनांचा गंध घ्यावा लागतो.... अशा नजाकत भर्या शद्बांनी गजलयुग व्यापून गेले होते. दिवाणापनाचे काही ‘मुशायरे’ अन् लज्जतभरे ‘तरन्नुम’ घेऊन या गजलश्यामची रौनक उत्तरोत्तर आणखीनच रंगत गेली.
मखदुम सोसायटी व नगर
व्यासपीठाच्यावतीने गणेश उत्सवातील अहमदनगर महोत्सवात मुशायराचे मुकुंदनगर
येथील ईनामदार हाॅल येथे दिलकश व जादुभर्या वातावरणात आॅनलाइन व आॅफलाइन
पध्दथीने कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करुन पार पडला. मुशायरात सर्व प्रथम
मौलाना हारुन यांनी कुरान पठण केले. बनारस येथील प्रसिद्ध कवि गुफरान अमजद
यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी जाकीर ईनामदार, डॉ.कमर
सुरुर, इलियास जनाब, मुख्तार चाचा,आरीफ सैय्यद,नादीर खान,शफकत
सैय्यद,राजुभाई शेख,साजीद शेख आदिं उपस्थित होते. यावेळी आबीद दुलेखान
यांनी नगर महोत्सव संकल्पना आणि प्रत्यक्ष कृतीतून एकतेचा संदेश देणार्या
मुशायर्याचे कौतुक केले. या मुशायर्यात दर्दी रसिकांना भारविण्या साठी
आलेल्या मदहोश आवाजाच्या शायरांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर
वातावरणाचा व मनांचा ताबा शायर व सूत्रसंचालक आसिफ सर यांनी घेतला व कही
सतसंग, भजन-किर्तन, कहीं पर नाअत कव्वाली... यहाँ के लोग मिल जुलकर मनाएँ
ईद व दिवाली....हर एक सुबे में अपना एक अलग पकवान बनता है.. सजा दो सबको
थाली में तो हिन्दुस्तान बनता है.....
या शेर ने सुरुवात करताच सर्व
रसिक सुरुवातीलाच राष्ट्रीय एकतेच्या वातावरणात मग्न झाले. यानंतर बीलाल
अहमद बिलाल यांनी आपल्या गजलांनी भारावून टाकले. स्वरांना समोर ओतल्यावर
रसिकांचा प्राण कानात गोळा करण्याचे सामर्थ्य लाभलेली त्यांची गजल....मेरी
आरजु शहादत
रसिकांना तृप्तीचा अनुभव देऊन गेली. गजलाचे व्याकरण, मक्ता,
रदीब, काफिया, मतला सांगतच डॉ.कमर सुरुर या गजलकराच्या ताब्यात मैफिल गेली.
‘माँ मै तेरे जैसी हूँ... हां मैं तेरे जैसी हूँ... अशा प्रकारची आई
वरील गजल डॉ.कमर सुरुर यांनी ऐकविली व संपूर्ण वातावरण शांत गंभीर झाले
सर्वांनी त्यांना भरभरुन दाद देत प्रोत्साहित केले.
यानंतर या गंभीर माहोलला परत रम्य करण्याची जबाबदारी नफीसा हया यांनी पार पाडतांना,,,कैसा अब के साल नया ये आया है,,
घर घर में एक मौत का मंजर छाया है ,,,
ही
कविता सादर करुन सभागृहात टाळ्यांची वाह ऽ वाह... मिळविली. तर मराठी कवि
हबीब पेंटरयांनी ,,काही मानसे अन्नात माती टाकतात,,,काही मानसे मातीत अन्न
उगवतात,,ही रचनेत वस्तु स्थिति मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
असणार्या बनारस येथील प्रसिद्ध कवि व प्रमुख पाहुने गुफरान अमजद यांनी
सर्व रसिकांची जणू नाडीच धरली व,,, वतन के वास्ते सब कुछ लुटा भी सकता हूं
,,,
वतन के वास्ते सर को कटा भी सकता हूं,,,
या व अशा अनेक कविता
सादर करुन टाळ्या व वाहऽ वाह.. ने संपूर्ण सभागृह वारंवार गाजत होता. सलीम
यावर म्हणाले की,,,तुझे ढुंडता हुं तेरी जुस्तजू है,, नहीं कोई मिलता तेरा
हुबहु है,,या प्रेमा वरील कवितेने मुशायरयाचा समारोप केला.
नगर
व्यासपीठतर्फे बोलतांना सुधीर मेहता चां संदेश आबीद दुलेखान यांनी दिला की,
मुस्लिम बँकेच्या सहकार्यामुळेच दरवर्षी राष्ट्रीय एकात्मतेवर आॅल इंडिया
मुशायरा संपन्न होत होता,पण कोरोनामुळे मागील दोन वर्षा पासुन या आॅल
इंडिया मुशायरा ला रसिक मुकले तरी पण मोठया मुशायरा ला सहकार्य याबद्दल
त्यांनी बँकेचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.कमर सुरुर यांनी
केले. सूत्रसंचालन आसिफ सर यांनी केले. आभार शफकत सय्यद यांनी मानले.
आॅनलाइन तेवीस शे रसिकांनी याचा आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वीते साठी जावेद मास्टर, आरिफ सय्यद, जावेद तांबोळी, नादीर खान, तन्वीर चष्मावाला, निसार बागवान, तारीक शेख, नईम सरदार तसेच नगर व्यासपीठ व मखदुम सोसायटीच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.


thanks viewers
ReplyDelete