नगर - स्वर सम्राट व गायकीच्या जगात आपल्या नावाची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या आदरणीय लता मंगेशकर जींच्या वाढदिवसा निमित्त अॅड. धाराणी दांपत्याच्या पुढाकाराने गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने रहमत सुलतान हॉल येथे कोरोना चे सर्व नियम पाळून लताजींच्या जुन्या नवीन गाण्याची मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये दिपा भालेराव, निता माने, डॉ. रेशमा चेडे, सुनील भंडारी, सुनिल हळगावकर, श्रीपाद शहाणे, दिनेश मंजरतकर, विकास खरात, संजय माळवदे, अॅड.अमीन धाराणी, चाईल्ड गायक आराध्या गायकवाड़ यांनी लता जीं चे, हाय शरमाऊं कीस कीस को बताऊ, ये रात भीगी भीगी, हम बने तुम बने, हम तुम दोनों जब मिल जायेंगे, याद किया दिल ने पुकार लो, तुझे देखा तो ये जाना सनम, या व असे अनेक ब्लॅक अॅण्ड व्हाईटचे 1960 ते आज पर्यंत ची नावाजलेली गीते सादर करुन हौशी कलाकारांनी सभागृहाचा माहोल संगीतमय व सुरीला ठेवला.
ग्रुपसाठी लता मंगेशकर जींचे फोटो दिनेश मंजरतकर यांनी स्वत तयार करुन दिले तर पेंन्सिलचित्र अक्षय वैद्य यांनी रेखांकन करुन दिले. मिठाई वाटप समीर खान, किरण उजागरे, विजय तण्णु, राम गालपेल्ली यांच्या वतीने करण्यात आले. हौशी कलाकार गायकांना रसिकांनी भरभरुन दाद देत त्यांचा उत्साह वाढविला. सुत्र संचालन करताना डॉ.रेशमा चेडे यांनी लता जीं बद्दल माहिती देत उतम रितया पार पाडले. प्रस्ताविक अॅड. अमीन धाराणी यांनी केले. टेक्निकल बाबी साहिल धाराणी यांनी पाहिले.
आभार श्रेयश पवार यानी मानले. कार्यक्रम यशस्विते साठी अॅड. गुलशन धाराणी, शौकत विराणी, गणेश सब्बन, आबीद खान, राम गालपेल्ली, संजय कुलकर्णी, अॅड. देवदत शहाणे आदिंनी परिश्रम घेतले.
