ईद-ए-मिलादुन्नबी

 दि. 19  ऑक्टोबर 2021.


ईद-ए-मिलाद सर्व जगाला शांतीचे संदेश देणारे इस्लाम धर्माचे संत हजरत मोहम्मद स्वल्ललाहू अलैहिव सल्लम (पैगंबर) यांचा जन्मदिवस.   म्हणून ईद-ए-मिलादुन्नबी साजरी केली जाते. प्रत्येक सत्कार्य म्हणजे परोपकार होय अशी शिकवण देऊन सर्व मानवजातीस प्रेम, सहानुभूती, सत्कार्य, सन्मार्ग, इमानदारीची शिकवण देत हजरत मोहम्मद पैगंबर यांनी लोकांना सत्याचा मार्ग दाखवला. आजचा दिवस माणुसकी धर्मात  सर्वात पवित्र समजला जातो.


सर्वत्र हा दिवस मोठ्या आंनदोत्साहात साजरा होतो. सर्व धर्मीय मिळून गावातील शहरातील चौकाचौकात पताके, स्वच्छता मोहिम,  घरांवर रोषणाई केली जाते. सर्व कुटूंब मिळून गोडधोड करतात, किंवा  मोठे स्वयंपाक करुन जेवणाचे आमंत्रण देतात, आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारांना शुभेच्छा देतात. 


परस्पर प्रेमभाव, बंधुता वाढविणारा या पवित्र सणानिमित्त सर्व समाजातील बंधु-भगिनींना ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!