दिलशाद सय्यद यांच्या रंग उन्हाचे काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

अकोले - ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था ,पुणे जिल्हा आयोजित कवयित्री अनिसा शेख, कवयित्री दिलशाद सय्यद संपादित फातिमा शेख काव्यगंध पुस्तक, अनिसा शेख लिखित संवाद ह्रदयाशी, सांगाती, कवयित्री दिलशाद सय्यद लिखित रंग उन्हाचे, प्रा.रेखा संगारे लिखित तीन घडीचा डाव अशा अशा पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पुणे येथे नुकताच पार पडला.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस अध्यक्ष स्थानी होते.तर ज्येष्ठ पत्रकार ,दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक मधुकर भावे , सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक अय्युब इलाही पुणे, डोंगरी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शबाना शेख,  सिहंगड कॉलेजचे प्राचार्य मकरंद वझल, साहित्यिक सुभाष सोनवणे, शरद पवार कला क्रीडा सांस्कृतिक विभागाचे राज्य समन्वयक संदीप राक्षे, ग्रा.मु म.संस्थंचे कार्याध्यक्ष जब्बार पटेल ,संस्थापक शफी बोल्डेकर, डॉ. मधुरा भावे,वकील हाशम पटेल, पुणे जिल्हाध्यक्ष बा.ह. मगदूम, इंतेखाब फराश, खाजाभाई बागवान , वेदांत प्रकाशनच्या संचालिका व सुप्रिया कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते. मधुकर भावे,श्रीपाल सबनीस साहेब यांनी दहशतवादाला कुठलाही जात धर्म नसतो.' असे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!