प्रवरा, म्हाळुंगी, म्हानुटी, नाटकी या नद्यांच्या संगमावर वसलेले संगमनेर शहर ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक शहराच्या नगरपालिकेला दीडशे वर्ष पूर्ण झाले असून या शहरात पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याबरोबर हरित संगमनेर, स्वच्छ संगमनेर व सुंदर संगमनेर बनवण्यासाठी सातत्यपूर्ण विकास कामातून ध्यास घेतलेल्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे या संगमनेर शहराच्या सामाजिक जीवनाशी अत्यंत एकरुप झालेले लोकमान्य नेतृत्व आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) व बाई यांच्याकडून संत सावलीमध्ये दुर्गा तांबे व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर बालवयातच समाजकार्याचे संस्कार झाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे दादांच्या पावलावर पाऊल ठेवून संगमनेरचा ग्रामीण विकास, सहकार सुसंस्कृतपणा जपत राज्याचे नेतृत्व सांभाळत आहे. याच वाटचालीवर संगमनेर शहरात आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका कार्यरत होती. 2005 मध्ये जनमाणसांच्या आग्रहास्तव दुर्गा तांबे यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवले गेले. खरेतर दुर्गा तांबे या महिला सबलीकरण, महिलांची आरोग्य यांसह साहित्य समाजकारणाची जोडलेल्या आहेत. आणि झालेही तसे ताई मोठ्या मतांनी निवडून आल्या आणि संगमनेर शहराच्या जन आग्रहास्तव पहिल्या महिला नगराध्यक्षा झाल्या.
पर्यावरणाची प्रचंड आवड असलेल्या ताईंनी स्वच्छतेला प्राधान्य देत स्वच्छतेतून समृद्धी निर्माण करत संगमनेर शहरामध्ये नवीन उद्यानांची निर्मिती केली. गंगामाई घाट सुशोभीकरण, भूमिगत गटारे, विविध वृक्षांचे रोपण, त्याची जपवणूक याच बरोबर नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरसाठी ऐतिहासिक अशी निळवंडे धरणातून थेट पाइपलाइन योजना राबवली. यामुळे राज्यात पाण्यासाठी काही शहरांमध्ये आठ दिवस वाट पाहिली जात असताना संगमनेरात मात्र मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा दररोज होत आहे. यतून एक आगळे वेगळे उदाहरण देशापुढे पुढे ठेवले गेले आहे. याचबरोबर संगमनेर शहरातील सुसंस्कृतपणा, सामाजिक एकोपा हा वाखाणण्यासारखा आहे. विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून सामाजिक विकासाच्या योजना सातत्याने दुर्गा तांबे यांनी राबविल्या आहेत. शहरात हायटेक बस स्थानक, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालय व क्रीडा संकुल अशा विविध वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. याचबरोबर मोठे दळणवळण असणार्या या शहरात सातत्याने रस्त्यांची कामे केली जात असून रस्त्याच्या दुतर्फा साईड गटारी निर्माण करण्यात आल्या आहेत.
आज राज्यामध्ये संगमनेर शहर हे आर्थिक स्थैर्य व सुसंस्कृत पणामुळे अग्रगण्य ठरले आहे. देशातील प्रत्येक बँक याठिकाणी स्थिरावली आहेत. आर्थिक संपन्नता, सुरक्षित वातावरण यामुळे प्रत्येकाला संगमनेर हे प्रत्येकाला आपलेसे वाटत आहे. या शहराचे विस्तारीकरण दिवसेंदिवस वाढत असून या नागरीकरणासाठी सर्व सुविधा नगरपालिकेच्यावतीने पुरविल्या जात आहेत. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत सातत्याने काम करणार्या दुर्गा तांबे या प्रत्येक कुटुंबातील घटक बनल्या आहेत. ताईंना अगदी प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती त्याचे नाते-गोते ओळखीचे झाले आहे. सुका कचरा-ओला कचरा ही अभिनव संकल्पना ताईंनी राज्याला दिली. या संकल्पनेवर अनेक शहरांमध्ये काम केले जात आहे. मोठमोठे प्रकल्प राबवताना दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
महिला या देशाचे नेतृत्व करू शकतात हे इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले. लता मंगेशकर, मदर तेरेसा, कल्पना चावला, प्रतिभा पाटील अशा महिलांनी विविध क्षेत्रात दैदीप्यमान काम केले. हा आदर्श, पुरोगामी विचार जपत दुर्गा तांबे संगमनेर शहरामध्ये सर्वांना समानतेची वागणूक देत शहराला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जात आहे. नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मोलाची साथ असून आज संगमनेर शहर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वैभवशाली शहर ठरले आहे आणि या सर्व कामाचे श्रेय दुर्गा तांबे यांना आहे.
भारतीय परंपरेमध्ये महिलांना मोठे स्थान आहे. मात्र देवी दुर्गा या नावाने दुर्गा तांबे या अत्यंत धडक पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या कामाची राज्यपातळीवर अनेकवेळा नोंद झाली आहे. सातत्याने महिलांना बरोबर घेत महिलांच्या आरोग्यासाठी हक्कासाठी लढणार्या दुर्गा तांबे या महिलांसाठी आदर्शवत नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यामुळे संगमनेर शहराची एक नवी ओळख देशात निर्माण झाली आहे.

प्रत्येक स्त्री ही कोणाची तरी आई, बहिण, मुलगी असते, त्यामुळे महिलांना आदर दया।
ReplyDelete