संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लावावे जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लावावे जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

नगर - शहर व जिल्ह्यातील मागील अंदाजे 4 ते 5 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेची सुमारे 2000 पेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत, ती तातडीने मार्गी लावण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्यावतीने शहराध्यक्ष अज्जूभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी शरिफ सय्यद, वाहिद शेख, सौ.रोहिणी पवार, सना शेख, युवराज गुंड, तौसिफ शेख आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या कारणामुळे जाणुन -बुजून प्रशासनच्या वतीने तहसीलदाराची सही नसले कारणाने, चौकशी अभावी, सहीला ठेवले आहे, असे सांगण्यात येत असून शासनाच्या अशा कारणामुळे संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. संजय गांधी निराधार योजना ही राज्य सरकारने विधूर, घटस्फोटीत, निराधार महिलांना एक मदतीचा हात दिला आहे. पंरतु शासन दरबारी असलेली दप्तर दिरंगाई व अधिकार्यांची अनास्थेमुळे महिनोनीमहीने रेंगाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजनेपासून मिळणार्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. निराधार महिलांना विनाकारण चकरा मारणे खुपच त्रासदायक ठरत आहे.

कृपया आपण जातीने लक्ष घालून संजय गांधी निराधार योजनासाठी लाभार्थी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती उचित कारवाई करन्यात यावी. संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लावन्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्यावतीने शहराध्यक्ष अज्जूभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी शरिफ सय्यद, वाहिद शेख, सौ.रोहिणी पवार, सना शेख, युवराज गुंड, तौसिफ शेख आदि.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!