शिवाजी महाराज हे मानवतावादी होते - प्रा.डॉ.सलाम सर

शिवाजी महाराज हे मानवतावादी होते - प्रा.डॉ.सलाम सर


नगर -
शिवरायांना धर्मापेक्षा स्वराज्य महत्वाचे होते. म्हणूनच स्वराज्यात प्रत्येक जाती धर्मांना स्वातंत्र्य होते. त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्यास मुभा होती. सर्वांना आपआपल्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य होते, शिवाजी महाराज हे मानवतावादी होते. माणसा-माणसात सत्ता नांदेल, एकोपा राहून प्रत्येकजण बंधूभवाने वागतील, असाच प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांनी केले.


मोहंमदिया एज्युकेश सोसायटीच्यावतीने मुकुंदनगर येथे संस्थेच्या मौलाना आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल, सावित्रीबाई फुले उर्दूं कन्या शाळा, मासुमियाँ अध्यापक विद्यालय, मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेजच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अब्दुस सलाम सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी मुख्यध्यापिका फरहाना सय्यद, हासिब शेख, फरिदा जहागिरदार, इनायतुल्ला शेख आदि उपस्थित होते.
सूत्रसंचालन बहार अंजुम यांनी केले तर आभार तलमीज सय्यद यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!