राष्ट्र पुरुषांची जयंती राष्ट्रीय दिनाच्या यादीत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाचा सरकारला विसर - आबीद खान

राष्ट्र पुरुषांची जयंती राष्ट्रीय दिनाच्या यादीत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाचा सरकारला विसर - आबीद खान

मौलाना आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नगर - सामान्य प्रशासन विभागाकडून 31 डिसेंबर 2021 रोजी सन 2022 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्या बाबत एक जीआर पारित झाले. त्यामध्ये भारताचे पहिले शिक्षण मंत्री तथा स्वतंत्र सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचा विसर यावर्षीही महाविकास आघाडी ला पडले आहे. व त्यांची जयंती साजरी करण्या चा उल्लेख करण्यात आलेला नाही. 

सर्वात अगोदर 2016 ला मौलाना आझाद व इतर कोणत्याही अल्पसंख्यांक राष्ट्रपुरुष किंवा स्वतंत्र सेनानी यांचे नाव या यादीतुन वगळण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी मागणी करूनही आज पर्यंत मौलाना आझाद यांचे नाव सुद्धा या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. असे निवेदन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा देशासाठी योगदान विसरता येणार नाही.ते स्वतंत्र भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते. तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. याकरिताच मुख्यमंत्र्याकडे अशा या थोर स्वतंत्र सेनानी चा जीआर मध्ये समावेश करण्याची विनंती मखदूम सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!