हज़रत अली (रजि.)मौलुदे काबा यांच्या जन्मदिना निमित्त इमामबाड़ा येथे भंडारा संपन्न

सण-उत्सवाच्या काळात समाज हिताचे उपक्रम राबवावे - प्रा.डाॅ.अब्दुस सलाम

नगर - सण-उत्सव काळात यंग पार्टी, मंडळे, प्रतिष्ठानने समाज हिताचे उपक्रम राबविले पाहिजे, त्यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळतो असे आवाहन मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ.अब्दुस सलाम सर यांनी केले.


टिळकरोड येथील इमामबाडा तर्फे हजरत अली रजि. (मौलुदे काबा)यांच्या जन्मदिनानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॅ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी खादीम नादिर खान (बब्बू भाई) काँग्रेसचे युवा नेते अज्जू भाई शेख, इमरान शेख, मोहसीन शेख, मतीन शेख, साजिद भाई, लतीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या सामाजिक कार्याला सतत चालू ठेवल्याबद्दल बब्बुभाई सवारी वाले यांचा प्रा.डाॅ.सलाम सर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

पुढे बोलतांना सलाम सर म्हणाले, यंग पार्टीच्यावतीने राबविलेला हा उपक्रम इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. समाजात काम करतांना अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन गरजू लोकांना फायदा होईल, असे उपक्रम राबविले पाहिजे,हीच शिकवन आपल्या संतांनी दिली आहे, त्याचे अनुकरण आज करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अज्जू भाई शेख यांनी केले. आभार इमरान शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तिलकरोड इमामबाड़ा च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!