हजरत सय्यद सहाब रहमतुल्लाआले दर्गाचा संदल उरूस उत्साहात

हजरत सय्यद सहाब रहमतुल्लाआले दर्गाचा संदल उरूस उत्साहात

देशात सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना.

अहमदनगर (प्रतिनिधी) - सर्जेपुरा येथील हुनसेनपुरा येथील हजरत सय्यद सहाब रहमतुल्लाआले दर्गाचा संदल उरूस निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या भंडाऱ्याचे उद्घाटन तोफखाना पोलीस स्टेशनचे पीआय ज्योती गडकरी, समाधान सोळंकी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सलमान खान, मोसिन पठाण, भैया शेख, आमिर खान, शाहरुख खान, शहेबाज खान, मजर शेख, आसिफ दगडू, रमिज मेंबर, भैया पटेल आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या संदल उरूस निमित्त पारंपारिक वाद्यावर धार्मिक गीताचे सादरीकरण झाले उपस्थित भाविकांच्या हस्ते दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात आली व देशात सुख शांती आणि समृद्धी साठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली व भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!