अलकरम हॉस्पिटल तर्फे शुक्रवारी मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर

अलकरम हॉस्पिटल तर्फे शुक्रवारी मोफत डोळे तपासणी व

मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर


नगर - अलकरम हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बुधराणी हॉस्पिटलच्या सहकाऱ्यांने शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तौफिक तांबोळी यांनी कळविले आहे.


तर रक्तगट तपासणी व स्त्री रोग तपासणी मोफत केली जाणार असून सोनोग्राफीमध्ये 40 टक्के सवलत दिली जाणार असल्याचे डॉ. नजमा जहीर यांनी सांगितले. रुगणांनी येताना आधार कार्डची झेरॉक्स बरोबर आणावी तसेच नाव नोंदणी आवश्यक असल्यामुळे 9860708016 किंवा 02412423333 या नंबर वर किंवा अलकरम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल शेजारी किंग्जगेटरोड अहमदनगर येथे समक्ष संपर्क करून नाव नोंदणी करावी. 


जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन अलकरम हॉस्पिटलचे डॉ. जहीर मुजावर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!