चांद बीबी यांच्या पुण्यतिथि निमित्त मख़दुम आणि मराठा सेवा संघ तर्फे वहया वाटप

धार्मिकप्रमाणे शैक्षणिक कामांना मदत करणे हेही पुण्याचेच काम- युनुस तांबटकर

अहमदनगर - धार्मिक कामात जसे आपण मोठ्या मनाने बंधनकारक म्हणून जसे दान-पुण्य करतो, त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना व छोट्या शाळांना शैक्षणिक मदत करणे त्यांच्या समस्या सोडविणेही पुण्याचेच काम आहे, असे प्रतिपादन रहमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनुस भाई तांबटकर यांनी केले.


मखदुम एज्युकेशन एण्ड वेलफेयर सोसायटी, मराठा सेवा संघ व रहेमत सुलतान फाऊंडेशनच्या वतीने दानशूरांच्या सहकार्याने चांद बीबी यांच्या पुण्यतिथि निमित्त जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा केडगांव मधील पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप युनूस भाई तांबटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्यध्यापिका आस्मा अशफाक शेख, आयेशा सुलताना आदि मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलतांना युनुस तांबटकर म्हणाले की, दिवसेंदिवस शैक्षणिक खर्च वाढत आहे. अशावेळी मोफत शालेय साहित्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे म्हणून सर्व सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात हे कार्य करण्याची गरज असल्याचे नमूद केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख आस्मा यांनी केले तर प्रास्तविक वरिष्ठ पत्रकार आबीद खान यांनी केले. आभार आयेशा सुलताना यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!