देवआनंद जन्म शताब्दी निमित्ताने सिने गीतांवर
दृकश्राव्य कार्यक्रम"खोया खोया चाँद" चे आयोजन
अहमदनगर : हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय सदाबहार अभिनेता देव आनंद यांच्या जन्म दिनाला २६ सप्टेंबर रोजी १०० वर्ष पुर्ण होत आहेत.
यानिमित्तानं आनंद क्रियेशन तर्फे देव आनंद यांच्यावर चित्रित लोकप्रिय सिनेमातली कृष्णधवल व रंगीत अवीट गीतांचा दृक श्राव्य कार्यक्रम रविवार दिनांक २४ रोजी सांयकाळी सहा वाजता रहेमत सुलेमान हॉल, सर्जेपुरा अहमदनगर येथे नंदकिशोर आढाव व दिलीप अकोलकर सादर करणार आहेत.
देव आनंद समवेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला,नूतन, वहिदा रेहमान, आशा पारेख, माला सिन्हा,नंदा, नलिनी जयवंत, निम्मी, वैजयंती माला व सायरा बानू इत्यादीवर चित्रित केलेली कालापानी, गाईड,तीन देविया, माया,असली नकली,सी आय डी, प्रेमपुजारी या शिवाय अनेक सिनेमातली गाणी मोठ्या पडद्यावर दाखविली जाणार आहेत.
सोबत देव आनंद यांचा चित्रपटांतील अनवट जीवन प्रवास आणि प्रत्येक गीताबद्दलचा अनोखा इतिहास उलगडला जाणारं आहे .रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश मोफत आहे.
कार्यक्रमाचे प्रायोजक प्रांजली पेस्ट कंट्रोल सर्व्हिस व आर.जे. असोसिएट असून देव आनंद च्या चाहत्यांना अनोखी संगीत मेजवानी मिळणार आहे.
तरी सिने रसिक व हिंदी गीतांची आवड असणार्या प्रेक्षकांनी या संधीचा अवश्य मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन नंदकिशोर आढाव व दिलीप आकोलकर यांनी केले आहे.
तरी सिने रसिक व हिंदी गीतांची आवड असणार्या प्रेक्षकांनी या संधीचा अवश्य मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन नंदकिशोर आढाव व दिलीप आकोलकर यांनी केले आहे.


