आनंद क्रियेशन तर्फे आज विश्व मानसिक आरोग्य दिनानिमित्तानं दृक श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन

आनंद क्रियेशन तर्फे आज विश्व मानसिक आरोग्य दिनानिमित्तानं दृक श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन 


Anand Creation organized a visual audio program on World Mental Health Day today

अहमदनगर : विश्व मानसिक आरोग्य दिवस प्रित्यर्थ आनंद क्रियेशनतर्फे अहमदनगर शहरातील रहमत सुलतान हॉलमध्ये बुधवार, दि. 11 अक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता 'इक बंजारा गाये जीवन के गीत सूनाये' हा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. 


ताण-तणावातून आनंदाकडे नेणारी गाणी या शीर्षकाखाली विविध ताण-तणाव अवस्थेतून समुपदेशन करून आनंदाकडे नेणारी हिंदी चित्रपट गीते विवेचन करीत सादर करण्यात येणार आहेत. फलटण येथे 2006 सालापासून गीत गुंजन श्रोता संघाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट सुवर्णकाळातील संगीतावर दृक श्राव्य कार्यक्रम तयार करून सादर करणारे उस्मान शेख (निवृत्त अधीक्षक अभियंता MSEB) हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 


आता पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या संगीतकार, गायक यांच्या गीतावर आधारित 28 दृक श्राव्य कार्यक्रम तयार करून फलटण, सातारा, पुणे सोलापूर, अमरावती येथे सादर केलेले आहेत. यापूर्वी नगरवासीयांसाठी उस्मान शेख यांनी व्हॅलेंटाईन्स ऑफ गोल्डन इरा या सुवर्ण काळातील प्रेम कथा वर आधारित कार्यक्रम सादर केलेला आहे.


भावनिक किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झगडणारया प्रत्येक मनुष्याला अस्वस्थ वाटत असल्यास तणावमुक्त कसे व्हावे? यासाठी प्रथमच नगरमध्ये एक आगळा वेगळा रसिकांना प्रबोधन व मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजक नंदकिशोर आढाव व दिलीप अकोलकरानी केली आहे. या कार्यक्रमासाठी प्रांजली पेस्ट कंट्रोल आणि आरजे असोसिएट तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांना मोफत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!