blood checking : समाजाची गरज ओळखून उपक्रम घेतले पाहिजे : शेरअली शेख

अलकरम हॉस्पिटल तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त मोफत रक्तगट तपासणी 
समाजाची गरज ओळखून उपक्रम घेतले पाहिजे : शेरअली शेख

blood checking


अहमदनगर : आपल्या देशात गरजूंची संख्या मोठी आहे. त्या प्रमाणात सामाजिक उपक्रमांची कमतरता आहे. आपल्याकडे रोज काही ना काही दिवस असतात म्हणून त्या निमित्त सामाजाची गरज ओळखून वेगवेगळे उपक्रम घेतले पाहिजे. जेणे करुन काही प्रमाणात आपण त्या गरजूंचा काही भार कमी शकतो. व या उपक्रमांत सातत्य असल्यास समाजाची आपल्याला नेहमी साथ मिळत राहते, असे प्रतिपादन अलकरम सोसायटीचे शेरअली शेख यांनी केले.


अलकरम सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशनल सोसायटीच्या अल-करम हाॅस्पिटलच्या वतीने पैगंबर जयंतीचे औचित्य साधून उत्कर्ष बालघर येथील विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. यावेळी उत्कर्ष बालघरचे युवराज गुंड, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, हुजैफ शेख, आशिष आहिरे, मुख्याध्यापीका सरला फंड, गणेश पवार, संजय जाधव आदि उपस्थित होते.


पुढे बोलतांना शेर अली म्हणाले, संपूर्ण जगात भारत एकमेव असा देश आहे, जिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. हाच या देशाचा खरा गौरव असून, या ओळखीनेच भारत हा जगात ओळखला जातो व अशा या देशात रोज काही ना काही निमित्ताने सण व सोहळे साजरे करतांना समाजाच्या हिताचे व आर्थिक दुर्बल असणार्‍यासाठी काही सामाजिक उपक्रम घेणे गरजेचे आहे, असे नमुद केले.


कार्यक्रमाचे प्रास्तविक मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद खान यांनी हाॅस्पिटलच्या वतीने वर्षभरातील वेगवेगळ्या घेण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन उत्कर्ष बालघरचे युवराज गुंड यांनी करतांना संस्थेच्या समस्या व गजरांविषयी माहिती देत समाजातील दानशुरांनी मदत करावी, असे आवाहन केले. शेवटी आभार हुजैफ शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!