ऋणानुबंध तर्फे शैक्षणिक पुरस्कार आणि महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाचे उद्या आयोजन
अहमदनगर - अहमदनगर शहरातील ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून शैक्षणिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असुन येत्या रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नगर शहरातील माऊली सभागृहात संध्याकाळी ४:३० वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, महाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक देवदत्त रोकडे आणि शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ऋणानुबंध कडुन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘आदर्श शिक्षण संस्था प्रशासक पुरस्कार’ हे अहमदनगर एज्यकेशन सोसायटीच्या छायाताई फिरोदिया, आत्मा मलिक शैक्षणिक संकुल व जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे नंदकुमार सुर्यवंशी आणि शिशू संगोपन संस्थेचे रतिलाल कासवा यांना जाहिर झाले आहे.
ऋणानुबंध आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये पाथर्डीचे शिक्षक संदीप राठोड, श्रीमती शुभांगी शेलार,शंकर भोईटे, बेलगाव ता. कर्जत, बापुराव वावगे, राशीन, ता. कर्जत, रंगनाथ सुंबे, चास, ता.नगर, ज्ञानेश्वर कांबळे, यशदा, पुणे आणि संगीत शिक्षक म्हणुन पवन नाईक अहमदनगर यांचा समावेश आहे.अशोक जोगदे यांचा विशेष सन्मान यावेळेस होणार आहे.
शासनाच्या पुरस्कारांच्या चौकटीत न बसणारे परंतु विद्यार्थी, समाज, पर्यावरण आणि संगीत क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांची निवड या पुरस्कारांसाठी झाली असे संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, उपाध्यक्ष सारिका रघुवंशी व सचिव प्रशांत बंडगर यांनी सांगितले.
याच कार्यक्रमाबरोबर महाराष्ट्रची लोकधारा हा मराठी गीतांचा विशेष संगीतमय कार्यक्रम होणार असल्याचे श्री.रोकडे यांनी सांगितले आणि जास्तीत जास्त लोकांनी या कौतुक सोहळयास उपस्थित राहावे असे आवाहन केले.

