चांद सुलताना हायस्कुल मध्ये शिक्षक व पालकांसाठी मोटीवेशनल कार्यशाळेचे आयोजन; Organized a motivational workshop for teachers and parents in Chand Sultana High School

चांद सुलताना हायस्कुल मध्ये शिक्षक व पालकांसाठी मोटीवेशनल कार्यशाळेचे आयोजन

अहमदनगर:: शैक्षणिक प्रगतीसाठी येथील चांद सुल्ताना हायस्कुल व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांतर्गत व्यवस्थापनाने या क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मोटीवेशनल स्पिकर सईद अहमद यांची कार्यशाळा रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर 23 रोजी आयोजित केल्या आहेत. रविवारी शाळेत होणाऱ्या पहिल्या सत्रात सकाळी दहा ते साडे अकरा पर्यंत शिक्षकांसाठी निमंत्रित वक्ते सईद अहमद मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या काळात स्पर्धेच्या युगात शिक्षकांची महत्वपूर्ण भूमिका आणि जबाबदारी तसेच परिणाम कारक ज्ञानदानाचे स्किल्स आणि टिप्स ते देणार आहेत.
Organized a motivational workshop for teachers and parents in Chand Sultana High School



दुसरे सत्र हे पालकांसाठी असून दुपारी बारा ते दीड वाजे पर्यंत वक्ते सईद अहमद पाल्यांच्या शिक्षणात पालकांची जबाबदारी, करियर निवडीत शालेय शिक्षणापासून करायची तयारी इत्यादी विषयावर ते पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

नव्या व्यवस्थापन कडून प्रथमच या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजन होत असल्याने शहरातील सर्व अल्पसंख्यांक संस्थेतील शिक्षकांनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन सय्यद अब्दुल मतीन व इतर पदाधिकाऱयांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!