अहमदनगर - मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स् अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. महाविद्यालय (उर्दु) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. अब्दुस सलाम शेख यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले. प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी प्रजासत्ताक दिना बद्दल बोलतांना “धार्मिक एकात्मता व अखंडता” व भारतीय घटनेबद्दल आपले सखोल व सविस्तर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरीदा भाभी तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिर्झा नवेद गयासबेग, शेख शरफुद्दीन जैनोद्दीन व इतर सभासद तसेच मुख्याध्यापक सय्यद नौशाद आणि सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका सय्यद फरहाना व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, मदर तेरेसा उर्दु कनिष्ठ महाविद्यालयचे शिक्षक वृंद, मासुमिया अध्यापक महाविद्यालय (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद इत्यादी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. सुत्रसंचालन बहार सय्यद यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन फरीदा जहागिरदार यांनी केले व शेवटी तलमीज सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

