Thakare Shivsena List Declarer : शिवसेनेकडून लोकसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी जाणून घ्या..
या जाहीर झालेल्या यादीमध्ये मुंबई-दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील खासदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊतांनी X च्या म्हणजेच माध्यमातून अशी माहिती दिलेली आहेत.
22 जागांवर निवडणूक लढविणार -
ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत यांनीही निवडणुकीत पक्ष यावेळी 22 जागांवर निवडणूक लढविणार असून उर्वरित पाच नावांची घोषणा होईल, असंही म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले, हातकणंगले मध्ये राजू शेट्टी शेतकरी नेते यांनी महाविकास आघाडी यांच्याकडे पाठींब्याची मागिणी केली असून यावर चर्चा आणि विचार सुरू आहेत.
अगोदरच जाहीर -
मुंबई दक्षिणमधून शिवसेनेने विद्यमान खा. अरविंद सावंत, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय पाटील आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे शिवसेना पक्षाने ५ ही विद्यमान खासदार यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहेत. यावेळी जाहीर झालेल्या सोळा नावां पैकी अकरा नावे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील महिनाभरातच त्या मतदारसंघांच्या दौऱ्याच्या अगोदरच जाहीर केले होते.
सस्पेंस कायम-
कल्याण लोकसभा जागेबाबत सस्पेंस कायम आहे. या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. शिवसेनेने आतापर्यंत एकूण 17 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाही पक्षाने तिकीट दिले आहे.
आता जनतेबरोबरच सर्वांच्या नजरा विधानपरिषदे चे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याकडे असणार आहेत. ज्यां नेत्यांना पक्षाने तिकीट दिले नाहीत त्यावर हि लक्ष असणार आहे. दानवे भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. दानवे यांनी ही अटकळ फेटाळून लावत ठाकरे यांना कधीही सोडणार नसल्याचे सांगितले.
उमेदवारांची यादी
सांगली- चंद्रहार पाटील
यवतमाळ वाशीम- संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
बुलढाणा- नरेंद्र खेडे
धरशीव- ओमराजे निवाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाढई
सिंधुदुर्ग रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजव विचारे
परभणी- संजय जाधव
मुंबई (उत्तर-पूर्व) – संजय दिना पाटील
रायगड- अनंत गीते
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई उत्तर पश्चिम- संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
या संदर्भातील अपडेट साठी follow करा..
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.