डॉ. कमर सुरूर यांना बज्मे उर्दू बैंगलोर तर्फे "मलिका-ए- सुखन" पुरस्काराने सन्मानित

डॉ. कमर सुरूर यांना बज्मे उर्दू बैंगलोर तर्फे

"मलिका-ए- सुखन" पुरस्काराने सन्मानित


अहमदनगर- अहमदनगर शहरातील उर्दू साहित्याला पोषक वातावरण निर्मिती साठी गेली अनेक वर्षे सदैव तत्पर असलेल्या डॉ. कमर सुरुर उर्दू भाषेचा विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात. लोकांमध्ये उर्दू भाषेची आवड निर्माण झाली पाहिजे.आणि उर्दू भाषेचा प्रचार आणि विकास व्हावा यासाठी नेहमी कार्यरत असतात.असे प्रतिपादन बंगलोरच्या बज्म-उर्दू साहित्य संस्थेचे सचिव गुफरान अमजद यांनी व्यक्त केले.

dr.kamarsurur




अहमदनगर येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ.कमर सुरुर यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना बज्मे उर्दू बैंगलौर तर्फे 2024 सालचा साहित्य पुरस्कार "मलिका-ए- सुखन" देऊन गौरविण्यात आले.
त्यानिमित्ताने बज्मे उर्दू बैंगलोर यांच्या तर्फे भव्य अखिल भारतीय मुशायरा आयोजित करण्यात आला होता.अलाह बख्श आमरी यांच्या अध्यक्षतेखाली मुशायरा संपन्न झाली.प्रमुख पाहुणे अल्हाज बाबाजी, मोहंमद खुर्शीद अक्रम कामली व सय्यद सलीमुद्दीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
dr.kamarsurur




या मान्यवरांच्या हस्ते डॉ कमर सुरुर यांना सन्मानित करण्यात आले. पाहुणे कवी आरिफ जमान आरिफ, तज्जमुल हुसेन जाहिद, नाज पुरवाई साहिबा, अलका शरर, रेशमां तलत, तसेच यजमान कवींनी उत्तम शब्दांचे पठण करुन शायरी सादर केली. श्रोत्यांनीही त्यांना भरभरून दाद दिली.
बज्मे उर्दूचे अध्यक्ष अकरमुल्ला अक्रम, सचिव गुफरान अमजद,बज्मे उर्दूचे सदस्य आणि बैंगलोरच्या मान्यवर प्रेक्षकांचे डॉ.कमर सुरुर यांनी "मलिका-ए-सुखन पुरस्कार" ने सन्मानित केल्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.