सावित्रीबाई फुले उर्दू शाळेत पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप
अहमदनगर - प्राथमिक शिक्षण हा जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. हा प्राथमिकचा पाया पक्का झाला तर पुढील शिक्षण हे सोपे जात असते. त्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष देऊन शिक्षणाचा पाया पक्का करावा.
मुकुंदनगर येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई उर्दू प्राथमिक कन्या शाळेत पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिलावर, शेख अस्लम पटेल, शेख शाहिन, शेख हिना, शेख मुमताज, शेख यास्मीन व शेख सुलतान आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक सय्यद नौशाद यांनी शाळेच्यावतीने वर्षभर राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती देऊन सर्वांचे आभार मानले.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.