एक शाम रफी के नाम लाईव्ह शोचे आयोजन
अहमदनगर- एस. के. प्रस्तुत हिंदी सिनेमाचे नावाजलेले गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त किरण उजागरे व समीर खान यांनी एक शाम रफी के नाम या सुरेल व सदाबहार गीतांच्या लाईव्ह शो चे शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 6-30 वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजन केले असल्याची माहिती समीर खान यांनी दिली.
या शोमध्ये पुणे येथील सारेगामापा फेम आंतरराष्ट्रीय गायक रफी हबीब, प्लेबॅक सिंगर अबोली गिर्हे(मुंबई) प्रसिध्द गायीका तृप्ती बाविस्कर(मुंबई) व अहमदनगर येथील समीर खान, किरण उजागरे व आतिफ खान हे मोहम्मद रफी यांचे सदाबहार गीते सादर करणार आहे. संगीत संयोजक निलेश सोज्वळ, ऍडविन पेरेपाडम तर नावाजलेले दहा म्युझिशियनस यात भाग घेणार आहे. निवेदक नाशिक येथील उस्मान पटणी करणार आहे. ध्वनी शांती ऑडिओ यांचे आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेशिका अनिवार्य असून त्यासाठी 70 20 68 14 22 या नंबर वर संपर्क करून घ्यावी असे आवाहन किरण उजागरे यांनी केले आहे.
Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.