निवडणुकीसाठी नियुक्त अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी सालीमठ

निवडणुकीसाठी नियुक्त अधिकार्‍यांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी सालीमठ

अहमदनगर - येणार्‍या विधानसभा निवडणुकीत नियुक्त अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी समन्वय राखत चोखपणे पार पाडण्याण्याचे निर्देश अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

Election 2024, Collector Salimath, ahmednagar


 आगामी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित निवडणूक कार्यालयामध्ये निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि समन्वय अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीमध्ये ते बोलत होते. 


यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक अधिकारी) राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Election 2024, Collector Salimath, ahmednagar

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट पद्धतीने काम केले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्व नियमांचे पालन करून त्याचपद्धतीने कामगिरी अपेक्षित आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांचे सर्व निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्रांचे आयोजित करावेत. त्यामध्ये प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन व रुपरेखा अधोरेखित करुन प्रशिक्षण द्यावे. निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभतेने पार पाडण्याच्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे व नियमांचा अभ्यास करत त्याचे तंतोतंत पालन करावे. 


Election 2024, Collector Salimath, ahmednagar


अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची निर्णय अधिकारी व पोलिस अधिकार्‍यांनी संयुक्तरित्या निरिक्षण व पहाणी कराणे. स्ट्राँग रुमच्या जेथे आहे त्या ठिकाणी त्रिस्तरीय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मतदानासाठी मतदान यंत्र वाटप आणि स्वीकृतीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्याबरोबरच आवश्यक त्या संपूर्ण उपाययोजना करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले.  


त्याचप्रमाणे भरारी पथक, निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीओ पाहणी पथकातील सदस्यांसह निवडणुकीस लागणार्‍या सर्व मनुष्यबळाचे नियोजनबद्ध नियुक्ती करावी. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होताच पथकांनी दक्ष राहून व चोख काम करावे. 


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदार संघामध्ये चेकनाके उभारावी. मतदारांना अवैधरित्या पैसे, मद्य, तसेच इतर साहित्याचे प्रलोभन देणार्‍यांची कसून तपासणी करण्याच्याही सुचना यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आल्या.


निवडणूकी संदर्भातील राजकीय पक्षांना काही अडचणीं येतात किंवा त्यांना विविध परवानग्यांची गरज भासते. या सर्व परवानग्या राजकीय पक्षांना वेळेतच मिळाव्या या हेतूने एक खिडकी योजना राबविण्यात यावी. या  परवानग्या राजकिय पक्षांना देताना ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावेत असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.


या निवडणूक बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्र, कायदा आणि सुव्यवस्था, निवडणूक विषयक खर्च व्यवस्थापन, मनुष्यबळ, आदर्श आचारसंहिता, साहित्य व साधनसामुग्री, ईव्हीएम स्ट्राँग रुम यासह विविध कामकाजाबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.