पदव्युत्तर दंत Dental Admission 2024-25 अभ्यासक्रमाचे निकष शिथील..काय आहे ते जानुन घेऊ..

पदव्युत्तर दंत Dental Admission 2024-25 अभ्यासक्रमाचे निकष शिथील..काय आहे ते जानुन घेऊ.. 

खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असलेले ५० पर्सेंटाईल किंवा २६३ गुण कमी करून २८.३०८ पर्सेंटाईल किंवा १९६ गुण इतके कमी करण्यात आले. खुल्या प्रवर्गाप्रमाणे आरक्षित प्रवर्गासाठी असलेले ४० पर्सेंटाईल किंवा २३० गुण कमी करून १८.३०८ पर्सेंटाईल किंवा १६४ गुण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेले ४५ पर्सेंटाईल किंवा २४६ गुण कमी करून २३.३०८ पर्सेंटाईल आणि गुण १८० इतके करण्यात आले आहेत.

Dental Admission 2024-25



पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी रिक्त राहिलेल्या ६५ जागांसाठीच्या प्रवेशासाठी आता आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) पात्रता निकष शिथील केले आहेत. याआधी सर्वसामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५० पर्सेंटाइल असणे आवश्यक होते. आता त्याऐवजी २८.३०८ पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत कमी पर्सेंटाइलमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून, राज्य सीईटी कक्ष आणखी एक विशेष फेरी लवकरच राबवणार आहे.


पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठीच्या ५२६ जागांसाठी राज्य सीईटी कक्षाने तीन नियमित आणि दोन स्ट्रे फेऱ्या राबवल्या आहेत. या फेऱ्यांमार्फत बहुतांश प्रवेश झाले असले, तरी अद्यापही ६५ जागा रिक्त आहेत. या पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठीच्या जागेसाठी सीईटी कक्षेमार्फत महत्वाची विशेष फेरी राबविली जाणार आहे. 

त्याचप्रमाणे  प्रवेशासाठीचे निकषही एनबीईएमएसने शिथील केले आहेत. या रिक्त जागांचा तपशील सोमवारीच जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीच्या वेळी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या फेरीसाठी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नसेल. या विद्यार्थ्यांना फक्त महाविद्यालयांचा पसंतीक्रम अद्ययावत करायचा आहे.निकषांमध्ये बदल काय?खुल्या प्रवर्गासाठी आवश्यक असलेले ५० पर्सेंटाईल किंवा २६३ गुण कमी करून २८.३०८ पर्सेंटाईल किंवा १९६ गुण इतके कमी करण्यात आले. खुल्या प्रवर्गाप्रमाणे आरक्षित प्रवर्गासाठी असलेले ४० पर्सेंटाईल किंवा २३० गुण कमी करून १८.३०८ पर्सेंटाईल किंवा १६४ गुण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेले ४५ पर्सेंटाईल किंवा २४६ गुण कमी करून २३.३०८ पर्सेंटाईल आणि गुण १८० इतके करण्यात आले आहेत.


विशेष फेरीचे वेळापत्रक-ऑनलाइन नोंदणी १६ ऑक्टोबरपर्यंतअंतरिम गुणवत्ता यादी १७ ऑक्टोबरऑनलाइन पसंतीक्रम १८ व १९ ऑक्टोबरअंतिम गुणवत्ता यादी २१ ऑक्टोबरप्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया २२ ते २५ ऑक्टोबरसीईटी सेलबद्दल-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्काचे नियमन) अधिनियम, २०१५ च्या कलम १० नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. 


महाराष्ट्र, भारतामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा ह्या आयोजित करावयाची जबाबदारी ही प्रशासकीय संस्थाकड़े  आहे. सीईटी कक्षाचा पहिला उद्देश्य अभियांत्रिकी परीक्षा, फार्मसी परीक्षा, कृषी परीक्षा, कायदा परीक्षा, वैद्यकीय परीक्षा, आयुष  परीक्षा या सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी सुलभ कसा होइल  याकड़े अधिक लक्ष देत आहे त्यामुळ आपल्या विध्यार्थाना अधिक सहज रित्या परीक्षा देता यावी. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.