पीर हजरत दावल मलिक न्यायप्रविष्ट जागे मध्ये गाळे अतिक्रमण धारकांवर कार्यवाहीची ट्रस्टची मागणी

पीर हजरत दावल मलिक न्यायप्रविष्ट जागे मध्ये गाळे अतिक्रमण धारकांवर कार्यवाहीची ट्रस्टची मागणी

Trust demands action against encroachment holders in Pir Hazrat Dawal Malik Judiciary

नगर - कर्जत मधील गट नं अनुक्रमे ७४६,७४८,७४९,७५०,७५१,७५२,७५३,७५४,७५५,७५६,७५७ हि जागा पीर हजरत दावल मलिक, कर्जत वक्फ बोर्ड मध्ये नोंद झालेली असून नोंदणी क्रमांक एमएसबीडब्ल्यू /एडीआर/४९८/ २०१९ असा क्रमांक आहे. पीर हाजरत दावल मलिक ची जागा वाचवण्यासाठी तोसिफ शेख यांचे २० डिसेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यलया समोर आत्मदहन केले. त्यावेळेस गट नंबर ७५७ मध्ये अतिक्रमण केलेले गाळे पाडण्यात आले. मात्र या कामी एक तोसीफ शेख यांचा निष्पाप जीव गेला.



२८ डिसेंबर २०२४ रोजी या गट नंबर ७५७ मध्ये पुन्हा गाळे धारकांनी बंटी यादव, अप्पा काळे व इतर रा. बहिरोबावाडी ता. कर्जत. वेळ दुपारी सोमनाथ जगताप यांच्या जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. सदर जागी पीर हजरत दावल मलिक चे ट्रस्टी त्या ठिकाणी तत्काळ गेले असता शिवीगाळ, दमदाटी, करून अंगावर धावून येतात.व आमच्याकडे या जागेची नोटरी आहे. या जागेचे आम्ही मालक आहे. व आम्ही इथे गाळे बांधणारच असे सज्जड दम आम्हाला देतात. ट्रस्टीनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला कि हि जमीन वक्फ बोर्ड मध्ये नोंद झालेली आहे. आपण सातबारा काढून बघावा.


तरी प्रशासकीय सुट्टीचा कालावधी बघून हे लोक हे काम करत आहेत. ही माहीती ट्रस्टी यांनी सय्यद वहाब यांना दिलि. सुट्टी असताना हे अतिक्रमण थांबावे या करिता सय्यद वहाब यांनी तातडीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कर्जत प्रांत, पोलीस निरीक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करुन सदरची कार्यवाही थांबविण्यासाठी प्रशासनाची मदत घेतली. यांच्यावर प्रशासनाने कार्यवाही ना केल्यास पुन्हा पुनरावृत्ती करावयाची वृत्ती दिसत आहे. 


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ उचित कार्यवाही करावी व संबंधित इसमांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी सय्यद वहाब यांच्या सह विश्वासत मंडळाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर, जिल्हा पोलीस अधिक्षक, कर्जत उप विभागाचे अधिकारी, प्रांत,तहसीलदार कर्जत, पोलीस उपअधिक्षक कर्जत, पोलीस निरीक्षक कर्जत, वक्फ कार्यालय अहिल्यानगर, महाराष्ट्र वक्फ बोर्ड संभाजीनगर यांना निवेदनाद्वारे माजिद इस्माईल पठाण, रज्जाक मुनीरखां झारेकरी, समशेर मिठूभाई शेख,अमीन रशीद झारेकरी, सुफीयान मुश्ताक सय्यद,युनुस दस्तगीर कुरेशी,शरीफ अकबर पठाण, शकील लियाकत अतार आदिंनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.