महापालिका ऑनलाइन प्लॅन मंजुरीसाठी संगणक प्रणाली विषयी विस्तृत माहितीबाबत कार्यशाळा संपन्न

महापालिका ऑनलाइन प्लॅन मंजुरीसाठी संगणक प्रणाली विषयी विस्तृत माहितीबाबत कार्यशाळा संपन्न 

नगर :   शासनाने ऑनलाईन प्लॅन मंजुरी आणि संबंधित गोष्टीसाठी संगणक प्रणालीला मान्यता दिली असून या मार्फत जलद गतीने संबंधित कामे करणे सुकर व्हावे हा यामागील हेतू आहे. ऑटो डीसीआर ही संगणक प्रणाली सोपी असून यावर ड्रॉइंगचे त्रेसिंग काढणे आणि इतर डाटा फिडींग जलद गतीने शक्य आहे तसेच कंपनीचे प्रतिनिधी यात काम करताना येणाऱ्या अडचणीत मदत करण्यास उपलब्ध असून दर बुधवारी ऑनलाईन डेमो सेशन आयोजित केले जात असून त्याची लिंक सभासदांना ग्रूप वर पाठवली जात असल्याचे ऑटो डी सी आरचे सपोर्ट अधिकारी  इम्रान पठाण यांनी सांगितले. 


nagar palika,online plan, News

आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो अहिल्यानगर व पोलादस्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो डिसीआर या नव्याने ऑनलाइन प्लॅन मंजुरीसाठी समाविष्ट संगणक प्रणाली विषयी माहिती दिली. यावेळी संतोष खांडेकर, मयुरेश देशमुख, प्रदिप तांदळे, सुनिल औटी, नंदकिशोर घोडके, संजय चांडवले, विजयकुमार पादिर. विकार काझी, नितिन कोरडे, रत्नाकर कुलकर्णी, कैलास ढोरे, दादासाहेब बेरड आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



संस्था सभासद व कंपनीचे ऑफिसर असलेले इंजि गणेश म्हस्के यांनी या प्रणालीचे प्रात्यक्षिक सादर करून सभासदांच्या विविध शंकांचे निरसन केले तर प्रदिप तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


यावेळी ऑटो डीसीआर या प्रणालीचा वापर करून पालिका नियमाप्रमाणे प्लॅन मंजुरीसाठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी ऑटो डी सी आरचे सपोर्ट अधिकारी गणेश म्हस्के आणि इम्रान पठाण यांनी या प्रात्यक्षिकाची विस्तृत माहिती दिली.  यामध्ये ऑटो डी सी आर ची वेब साईट आणि सॉफ्ट वेअर आपल्या संगणकावर इंस्टॉल करणे, टेक्निकल पर्सन रजिस्ट्रेशन करणे, ओनर रजिस्ट्रेशन, प्रोजेक्टची डाटा एंट्री करणे, प्लॅन ड्रॉइंगचे ट्रेसींग काढणे आणि सर्व कागदपत्रे व ड्रॉइंग सबमिट करणे या सर्वांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. 


यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष आदिनाथ दहिफळे यांनी सांगितले की पूर्वी महापालिका हद्दीत प्लॅन सबमिट करणे, ले आऊट , सब डीव्हिजन अथवा तदसम् इतर सर्व मंजुरीसाठी बीपीएमएस ही संगणक प्रणाली उपलब्ध होती. त्यावेळी या सिस्टिम मध्ये काही अडचणी आल्या अथवा अपडेट साठी सिस्टिम बंद असेल तर प्लॅन मंजुरी आणि इतर कामासाठीची सर्व यंत्रणा ठप्प होत असे. ऑटो डी सी आर प्रणालीमुळे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असून महापालिका, टी पी हद्दीत काम करणारे नोंदणीकृत अभियंते आणि वास्तू विशारद यांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असून काम करणे सोपे झाले आहे. यासाठी वेळोवेळी ऑटी डी सी आर कंपनीचे प्रतिनिधी आपल्या संस्थेच्या सभासदांना ट्रेनिंग देणार असल्याचे व आपण त्यासाठी डेमो प्रात्यक्षिके आयोजित करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!