माश्यांनी आणली निंबवी ग्रामस्थानावर आंदोलनाची वेळ

माश्यांनी आणली निंबवी ग्रामस्थानावर आंदोलनाची वेळ

गावातील वेक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म या कंपनीपासून गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका.
गावात माश्यांच माश्यां होत असून पोल्ट्री व्यवसाय गावातून बंद करण्याची मागणी.

news


नगर - श्रीगोंदा येथील  निंबवी गावामध्ये ४०० मीटरच्या आत वेक बॉयलर रिचार्ज अँड ब्रीडिंग फार्म या पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास धोकादायक पोल्ट्री व्यवसाय थाटला आहे. यामुळे गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी माश्यांच माश्यां मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. शेतामध्ये, घरात, जेवणामध्ये प्रत्येक ठिकाणी माश्यांच माश्यां आढळत आहे. यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोकात आले असून हे पोल्ट्री व्यवसाय निंबवी गावातून बंद करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माश्यांचे ताट घेऊन व झाडावर लागलेले माश्यां गळ्यात घालून उपोषण करताना आनंदा गावडे, अमोल गावडे, स्वप्निल लोखंडे, अशोक गावडे, भानुदास गावडे, दत्तात्रेय गावडे, विठोबा गावडे, बाळू गावडे, धोंडीबा गावडे, राहुल वाळके, मच्छिंद्र वनपुरे, राहीबाई गावडे, कविता गावडे, स्वाती गावडे, शारदा गावडे, शकुंतला शिर्के आदी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, वेक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म कंपनीचे कन्सल्ट परवाना निंबवी गावातील सातबारा उताऱ्यावर नाही जो गट नंबर आहे तो अस्तित्वातही नाही असा अहवाल महसूल विभाग श्रीगोंदा यांच्याकडून प्राप्त झाला आहे तसेच या कंपनीला व्यवसाय परवाना प्राप्त करून घेण्यासाठी निंबवी ग्रामपंचायत यांचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर केले आहे व या विषयाची अहवाल पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडून प्राप्त झाला आहे व्यवसायासाठी आवश्यक असणारे अनेक अधिकृत परवाने कंपनीला निंबवी ग्रामपंचायतने प्राप्त केलेले नसताना निंबोळी गावात रहिवासी वास्तव्यापासून ४०० मीटरच्या आत पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्य धोकादायक परिस्थिती व प्रदूषित वातावरण तयार केलेल्या आहे त्यामुळे सदर ही कंपनी त्वरित बंद करण्यात यावी व सदर कंपनीचे सातबारा व गट नंबर अस्तित्वात नाही तसेच ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र अधिकृत सही शिक्केनुसार नाही व या व्यवसायाने केंद्रीय भूजल विभागाची परवानगी देखील नाही तसेच या व्यवसायास आरोग्य विभाग श्रीगोंदा यांची वाढीव बांधकामास परवानगी देखील नाही या व्यवसायास पशुसंवर्धन विभाग श्रीगोंदा यांची बांधकामाच देखील परवानगी नाही तसेच सदर प्रदूषणकारी व्यवसाय हा मानवी वस्ती पासून ३८० ते ४२५ मीटरच्या आत सुरू आहे जो नियमावलीनुसार ५०० मीटरच्या पुढे असावा त्यामुळे या व्यवसायाला त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!