अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, येथे 'इंटरव्ह्यू स्किल्स' कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांची करिअरकडे यशस्वी वाटचाल

नगर - फार्मास्युटिकल क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या युगात, केवळ तांत्रिक ज्ञान असून चालत नाही, तर मुलाखतीमध्ये स्वतःला प्रभावीपणे सादर करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. हे ओळखून, अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, अहिल्यानगर द्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना नोकरीसाठी सज्ज करण्यासाठी विशेष 'इंटरव्ह्यू प्रिपरेशन' सत्राचे आयोजन डॉ . योगेश बाफना यांचा मार्गदर्शना खाली करण्यात आले.


या सत्राचे प्रमुख GTT foundation ,Pune चे ट्रेनर प्रा.अंकुश भालेराव यांनीया उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मुलाखतीतील आव्हानांना कसे सामोरे जावे, याचे मार्गदर्शन केले . या कार्यशाळे मध्ये   विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे मार्गदर्शन केले गेले.


मुलाखतीसाठी यशाची सूत्रे

कंपनीचा सखोल अभ्यास (Research):* ज्या कंपनीत मुलाखतीसाठी जात आहात, त्या कंपनीच्या उत्पादनांची, मार्केटमधील स्थानाची आणि ध्येयधोरणांची माहिती आधीच मिळवा.


तांत्रिक ज्ञानावर प्रभुत्व (Technical Knowledge)

 फार्मसी विद्यार्थ्यांसाठी फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी आणि ड्रग रेग्युलेशन यांसारख्या विषयांचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. मुलाखतीपूर्वी आपले शैक्षणिक कन्सेप्ट्स पुन्हा एकदा उजळणी करून घ्या.


प्रभावी संवाद कौशल्य (Communication Skills)

मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासपूर्ण आणि स्पष्ट भाषेत उत्तरे द्या. तुमची भाषा साधी पण मुद्देसूद असावी.


देहाबोली (Body Language)

 मुलाखतीची खोली 'नॉक' करून आत जाण्यापासून ते बाहेर येण्यापर्यंत तुमची देहबोली सकारात्मक ठेवा. हातांची हालचाल, डोळ्यांत पाहून बोलणे (Eye contact) आणि चेहऱ्यावरचे हास्य यांचा सकारात्मक प्रभाव पडतो.


वेळ पाळणे (Punctuality) :

मुलाखतीच्या ठिकाणी वेळेच्या १०-१५ मिनिटे आधी पोहोचा. वेळेचे नियोजन तुमच्या शिस्तीचे प्रतीक असते.

"तुमच्या स्वतःबद्दल सांगा" किंवा "आम्ही तुमची निवड का करावी?" अशा सामान्य पण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आधीच तयार ठेवा.

अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य डॉ . योगेश बाफना यांनी सांगितले की, 

"आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला योग्य दिशा मिळावी, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. केवळ पदवी मिळवणे हे ध्येय नसून, एक उत्तम 'फार्मास्युटिकल प्रोफेशनल' घडवणे हे आमचे ध्येय आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःला अधिक सक्षम करावे."

विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करून आगामी काळात येणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंट्समध्ये उत्तम कामगिरी करावी, अशी आशा कॉलेजचा उपप्राचार्य वर्षाराणी आव्हाड यांनी  व्यक्त केली आहे.


Arihant college

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!