आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संघटनाच्यावतीने कोविड योद्धांच्या सन्मान व मेळावा संपन्न
अहमदनगर : संघटनेत काम करतांना संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार काम केले पाहिजे. संघटनेचे कार्य वाढत असतांनाच समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्यांचाही गौरव करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. समाजातील दु:ख कमी व्हावे, वंचित घटकांना न्याय मिळावा, त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. व्यक्तीगत स्वार्थापेक्षा समाजाहीत डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर चांगले काम करत असून, राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकारीही सक्रिय सहभाग देत आहेत. जात-धर्म-पंथ या पलिकडे जाऊन काम केले पाहिजे. कोरोना काळात अनेकांनी अशाच पद्धतीने काम करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अखिल मानवजात ही एक असून, प्रत्येकाला त्याचे हक्क मिळवून देऊन, कर्तव्याचीही जाणिव करुन दिली पाहिजे, त्यातून एक चांगला समाजनिर्मिती होईल. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना व माहिती अधिकार पोलिस मित्र संघटनेच्यावतीने कोविड काळात प्रशासकीय व सामाजिक कार्य करणार्या पोलिस, पत्रकार, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश सकुंडे, माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे, प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, राजदूत संघटनेचे राज्य प्रदेश अध्यक्ष अफसर चाँद कुरेशी, प्रदेश समन्वयक इस्सा शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुलेमान शेख, संतोष माने, नानासाहेब मेढे, जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला, शहराध्यक्ष मुसदीक मेमन, मीडिया प्रमुख जाकिर पठान, फ़िरोज़ पठान, प्रविण राठोड, शन्नो पठान, संजय जाधव, सलमान शेख, साहिल शेख, संतोष माने, नानासाहेब मेढे, जाकिर पठाण, संजय जाधव, देविदास लिमजे आदि उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला म्हणाले, आंतरराष्ट्रीय मानव अधिकारी राजदूत संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले आहेत. समाजातील चांगल्या-वाईट घटनांवर संघटना पाठपुरवा करुन ते प्रश्न मार्गी लावत आहे. संघटनेच्या वरिष्ठ पातळीवरुन मार्गदर्शनानुसार संघटना काम करत असून, पुढील काळातही असेच कार्य सुरु राहील. कोरोना काळात काम केलेल्या कोरोना योद्धांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास तालुकाध्यक्ष युवराज गुंड, पारनेर तालुकाध्यक्ष समीर पठाण, जिल्हासंपर्क प्रमुख राजुभाई जहागिरदार, शहर उपाध्यक्ष शुभम मिरांडे, शहर महासचिव आवेज जहागिरदार, शहर सचिव करण पुप्पाल, युवक शहराध्यक्ष फजल शेख कराचिवाला, वसिम जरीवाला, खान नासिर, समीर बेग, सरफराज मनियार, तनवीर शेख, ज़ैद शेख, जव्वाद बागवान, अॅड.रिजवान जरीवाला, अफरोज सय्यद, तारिक शेख, नवेद शेख, जिया जहागिरदार, जाहिद शेख आदिंसह सदस्य उपस्थित होते.
यावेळी कैलास पठारे, तुळशीराम जांभुळकर, अफसर कुरेशी आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी एस.टी.स्टॅण्ड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शहरातील कोतवाली, भिंगार व अधिक्षक कार्यालयामध्ये जाऊन पोलिसांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन धावारे सर यांनी केले तर आभार खान नासिर यांनी मानले.

thanks viewers
ReplyDelete