पुरात माणसे, जनावरे, जेसीबी गेली वाहून
शेवगाव तालुक्यात पुराचे पाण्याचे हाहाकार
अहमदनगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात सोमवारी झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे तालुक्यातील वडुले, वरुर, भगूर, आखेगाव, खरडगाव नदीकाठच्या गावात पुरा स्वरुप प्राप्त झाल्याने अनेकांचे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरे, वाहने व पिकांचे सर्वात जास्त नुकसान झाले व वाहून गेले. वडुले या गावातील नागरीक सागाडे हे बेपत्ता झाले असल्याने त्यांचा शोध राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व औरंगाबाद महानगरपालिकाचे आपत्ती व्यवस्थापन पथक हे युध्द पातळीवर करत असल्याचे वृत्त आहे.
यात अनेक नागरिक पुरात अडकल्याचे माहिती मिळताच पथकाने त्यांना त्यातून सुटका करुन सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे महत्वाचे काम सुरु होते. सोमवारी ते मंगळवारी सलग दोन दिवस सुरु झालेला संततधार पावसाने रात्रभर ते दुपारपर्यंत पर्यंत हजेरी लावल्याने अनेकांना विचार टाकले होते. संततधारेमुळे नदी-नाले एक झाले, धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. यामुळे गावातील छोटे मोठे पुल हे या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन एसटी महामंडळाची बस व अनेक वाहनांच्या खुप लांबपर्यंत रांगा होत्या. दरम्यान नंदिनी व नानी नदी शेजारच्या गावांना पुराने वेढल्याचे वृत्त हाती लागले होते.
हातावरती उदरनिर्वाह करणाऱ्या सामान्यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेले घरांच्या भिंती कोसळून ते बेघर झाले, अनेक जण घरांच्या छतावर, तर काही नागरीक झाडावरती रात्रभर होते. यात सर्वात जास्त पाळीव व गावातील मुक्या जनावरांना पुराव्या पाण्यातून कोणीही वाचवू शकले नाहीत. आखेगाव येथील नानी नदीवर असलेल्या बंधाऱ्यात जेसीबी यंत्र, टँकर, दुचाकी वाहने वाहून आल्याची माहिती मिळाली आहे.
संबंधित घटनेची माहिती नागरिकांनी दिली आहे. काही जनावरे वाहून गेले. अनेकांची शेतकऱ्यांचे शेती वाहून गेल्याने खुप मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे फळ व पिके पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठे प्रचंड नुकसान झाले आहेत. नेवासा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच आमदार राजळे, सभापती घुले इतर अधिकारी वर्गांनी पूरग्रस्तांची भोजन व्यवस्था व अनेक गावांना भेटी देवून मदत कार्यासाठी आल्याचे समजले, येथील नागरिकांना भेटी देऊन नागरिकांना मदत करुन दिलासा दिल्याचे माहिती मिळते.