साने गुरूजी : मानवता धर्मच खरा # गीत : खरा तो एकची धर्म
साने गुरुजींनी लिहलेली ही कविता खुप काही शिक्षण देते, मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी आदर्श शिक्षक, समाजसुधारक आणि लेखक होते. त्यांनी बऱ्याच कविता, साहित्य व पुस्तके तुरुंगातच लिहिली, ते वैभव शाली घराण्यातले, त्यांच्या मातोश्री चे चांगले संस्कार घडले ते सामान्याचे प्रश्न सोडविन्याचे खुप मोठे कार्य केले होते. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. सोलापुरातील जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी १९४६ साली महाराष्ट्र दौरा केला, यासाठी महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत नाही मिळाला. शेवटी गुरुजींनी यावर उपोषण करून यश मिळवले. पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले असे लोक म्हणायला लागले. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे खुप मोठे कार्य केले. समाजात जनजागृति, समाजसुधार त्या बरोबरच मुलांवर संस्कार घडविले, त्या बरोबर अनेक पुस्तके, अनेक कादमबरी लिहिली त्यातील श्यामची आई, मोलकरिन ही खुप प्रसिद्ध झाल्या त्यावर फिल्म तयार झाल्या. खरा तो एकची धर्म कविता खुप प्रसिद्ध आहे।
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
- साने गुरुजी


👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद प्रोत्साहन दिल्याबद्दल
Deleteधन्यवाद प्रोत्साहन दिल्याबद्दल।
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteTanks Saheb
Deletenice
ReplyDelete👌👌छान
ReplyDeleteNICE
ReplyDelete