गणेशोत्सवाची सुरूवात...
भारत देशात सर्वात जास्त लोकप्रिय सण म्हणजे श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक सण आहे. पुरानात 12 गणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्लला झाला असे मानतात. या चतुर्थीला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे मानले जाते की, गणेरायाला प्रसन्न किंवा आर्शिवाद घेतल्याने घरात सुख, समाधान, समृद्धी व शांती प्राप्त होते. गणरायाला लाडू व गुळाचे मोदक आवडत असल्यामुळेच चतुर्थीला मोदक आणि लाडू बनवून अर्पण करतात, पूजेनंतर आरती करतात. या सणात गणेरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात.
या विधीमध्ये मूर्तीची आवाहन, स्नान व अभिषेक करुन.चांगले वस्त्र व सुगंधी चंदन, फुले असे अनेक प्रकारे पत्री नैवेद्य इ. सोळा उपचारांनी पूजा करतात. यात विविध 21 पत्री अर्पण करतात. या वनस्पती पावसाळा असल्यामुळे सहज उपलब्ध होत असतात त्यामुळे प्रत्येक वनस्पतीला काही औषधी महत्व असते. गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी तिची पूजा केली जाते. विसर्जनापूर्वी विविध मंत्रजाप केले जाते. तीन मूर्त्यांवर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जल्लोष व जयघोष करत मिरवणूक काढण्यात येते खेड्यां गावांत व शहरात विसर्जना अगोदर डिजे व वाजंत्री लावले जातात, गावातून मिरवणूक काढून एखाद्या विहिरीत किंवा समुद्रात, नदीत विसर्जन केले जाते. काही परीवारात 21 दिवस व्रत पाळतात काही वार्षिक स्वरूपात पाळत असतात.
या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.
सार्वजनिक गणेश सणाची सुरुवात टिळकांनी 1894 वर्षी आमलात आणली. यावेळेत गणेशाच्या उपस्थितीत धार्मिक व सामाजिक सार्वजनिक आणि फिल्म किंवा नाटीका मनोरंजक दृष्य इत्यांदीचे देखावेंचे कार्यक्रम केले जातात. लोकमान्य टिळकांनी तमाम भारतीयांना जात धर्म सोडून एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये एकता, बंधुता आणि राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.


thanks viewers again...
ReplyDeleteJay ganesh
ReplyDelete