व्यसन : तंबाखू

तंबाखू प्राचीन व्यसनपदार्थ आहे. पूर्वी तंबाखू हे पदार्थ चलन म्हणून वापरले जात असत. हे पदार्थ पूर्वी खुप महत्वाचे मानले जात होते. आज ही या पदार्थाला खुपच महत्व आले आहे. ते वेगवेगळे प्रकारे त्याचे वापर केले जाते. जसे तंबाखू-चुना, सीगारेट, वीडी, धूर ओढणे, चघळणे, तपकीर या व्यसनापासून 75 टक्के व्यक्ती ग्रस्त असल्याचे दिसते. आणि हे सर्वात जास्त प्रचलित व्यसन आहे व वापरही अवाढव्य आहे इ. पध्दतींनी तंबाखूचा वापर केला जातो. 


शारीरिक दुष्परिणाम -

तंबाखू निकोटीन नावाचे रसायन असते ते शरीरासाठी अत्यंत घातक असते. आपण त्याचे सेवन केल्यानंतर ते लाळेमार्फत श्‍वसनातून आपल्या रक्तात मिसळते. त्याचे आपल्या शरीरावर त्याचे घातक परीणाम होते. जसे हृदय, फुप्फुस, जठर व  रक्तवाहिन्यांवर होत असतो. 


रक्तवाहिन्यांवर होणारे परिणाम 

- अवयव बिघडतात. (उदा. बोटे काळी पडून झडणे.)

- रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाबही वाढतो.

- निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते - ओठ, जीभ, गाल, श्‍वासनलिका तिथे कॅन्सर होऊ शकतो.

- धूम्रपान करणाऱ्यांना श्‍वसनमार्गातला कॅन्सर होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे.

- गरोदरपणी धूम्रपान केल्यावर गर्भावर परिणाम होवून बाळ कमी वजनाची निपजतात.

- हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होऊन हृदयविकार बळावतो हेही सिध्द झाले आहे.

- श्‍वसनमार्गात कफ वाढते. श्‍वासनलिका-उपनलिका अरुंद होऊन श्‍वसनाचा कायमचा आजार होतो. 

- तंबाखू च्या धुळीत कामाला असलेल्या कामगारांना सतत तंबाखू छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार होतात. 

- एकाच वेळी जास्त तंबाखू - धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो. अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ, उलटया, चक्कर इ. दुष्परिणाम होताना दिसतात. डोळयाच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठया होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो व शेवटी मृत्यू होवू शकतो.


- धूम्रपानाचे परिणाम लवकर व घातक होते.

- तंबाखू चघळणे (कॅन्सर सोडता) कमी धोकादायक आहे.

खरे तर दारूपेक्षा अधिक नुकसान तंबाखू ने विशेषतः धूम्रपानाने होते. कुटुंबाचा रोजचा तंबाखू चा खर्च एकदोन रुपयांपासून वीस-पंचवीस रुपयांपर्यंत जातो.  अत्यंत गरीब कुटुंबात हे आर्थिक संकटच आहे. सिगरेटपेक्षा विडी स्वस्त असली तरी विडी-जास्त गरीब असल्याने नुकसान होतेच. तंबाखू ला जर आळा घालता आला तर वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठया प्रमाणात वाचू शकतो. 


तंबाखू पिकविणाऱ्यांना आणि कारखानदारांना दुसऱ्या उत्पन्नाचा मार्ग शोधावे लागेल. परंतू तंबाखू व धूम्रपानावर बंदी घालणे अवघडच आहे कारण त्याचे तंबाखू चे आर्थिक साम्राज्य खुपच मोठे आहे. सिगरेट या उद्योगाने जाहिरातीमार्फ पूर्वी खुपच जाहिरातबाजी करुन प्रसार करून पायेमूळे रोवल्याचे दिसते. 

याचा मानवी आरोग्यावर धोका लक्षात आले तेव्हा अनेक देशांनी सिगरेटच्या ॲडव्हरटाईसमेंटला बंदी घातली व धूम्रपान हे आरोग्यास घातक आहे. अशा सूचना त्या संबंधीत पाकिट व पुड्यांवर छापण्यात आले. नवीन कायद्यामुळे आता तंबाखूजन्य पदार्थांवर व उत्पादनांवर मानवी आरोग्यास धोक्याचे असल्याचे चित्र छापाई करणे बंधनकारक केले आहे.

सरकारी कार्यालयातर धूम्रपान करण्यास मनाई आहे. असे फलकच असते. आपल्या ठिकाणचे बस व रेल्वे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी असे स्टीकर व फलक लावण्यात आलेले आहे. हवेत धूर पसरला जातो व तंबाखुचे पदार्थ हवेत तरंगतात व धूम्रपान न करणाऱ्यांनाही याचा खुप मोठा धोका तयार होतो. प्रत्यक्ष धूम्रपानाप्रमाणे या फुकट धूम्रपानानेही आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यापासून राहत नाही. हे व्यसन 15-20 वयोगटातच लागते. अनेकवेळा इतरांचे बघुन व मित्राच्या विनंती व आग्रहास्तव आणि मित्रांसमोर पुरुष दाखविणेसाठी किंवा गंमत म्हणून सुरुवात होते असते परंतू ते कायम स्वरूपी सवय होवून जाते. तंबाखुत अनेक मादक पदार्थ भेसळ करून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. 

धूम्रपान ही एक घाणेरडी सवय व गलिच्छ म्हणून ओळखली जाणारे व्यसन आहे. हि सवय आजारी करणारी सवय आहेच. लहान मुलांना आजपासूनच त्या विषयी चिड निर्माण करणे खुपच महत्वाचे आहे. धूम्रपानाने दातांचा रंग हा पिवळा व कालसर होतो व तोंडावाटे दुर्गंधी व वास येतो. यामुळे जास्त व अनेक आजार जडतात व ते आजारातून बाहेर येण्यासाठी खुप पैसा खर्च करावे लागते. असे आपल्या मुलांना किंवा मित्रपरिवारात वारंवार सांगणे अत्यंत महत्वाचे होत चालले आहे. समाजात सभ्य व्यक्ती हि ओळख र्निव्यसनी असणे सभ्यपणाचे लक्षण आहे. असे आपल्या लहानग्यांना शिकवण देणे काळाची गरज आहे.

उपाय - तंबाखु सोडविण्यासाठी अनेक उपाय योजना आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निकोट मेडिसीन किंवा इतर औषधी घेवून त्यावर उपाय योजना करता येते.

Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Thanks Watching & Reading News, Articles. Regards, Lokheet Graphic, News and Educational Purpose Channel.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!