आपले आहारचे योग्य नियोजन व संतुलन राखायचे असेल, तर आपल्याला हिरव्या भाज्या, दूध आणि डाळी, कडधान्ये इत्यादींच्या सोबत दररोज फळांचा समावेश आहारामध्ये किंवा सेवनामध्ये करने अत्यंत महत्वाचे असणे आवश्यक आहे. जसे केळी, पपई, खजूर, संत्री, मोसंबी, डाळींब इ. परंतू त्यातीलच एक म्हणजे अंजीर एक फळ आहे तो म्हणजे अंजीर. आपल्या भागात हे दोन स्वरुपात उपलब्ध असतात ताजे व सुके हे दोन्ही स्वरपात सेवनास अत्यंत लाभकरी व योग्य आहे. आरोग्याला अतिशय फायदेशीर, नियमित सेवन करण्याचे सल्ला आपले फॅमिली डॉक्टर किंवा ज्येष्ट आहारतज्ञ देत असतात.
आपल्याकडे हवामान व वेगवेगळ्या ऋतूमध्ये अनेक ताजी फळे मिळतात. हे अल्लाह, परमेश्वर, भगवान यांनी दिलेली मनुष्याला दिलेले वरदान किंवा देणगी आहे. हे सर्व फळे ताजी भरपूर रस असलेली फळे आपल्या शरीराच्या हेल्थ मेंटेन करण्यासाइी अतिशय फायदे देणार आहे.
फायदे -
* या फळात फायबर घटक अतिशय अधिक प्रमाणात असते. त्याने पोट साफ होण्यास मदत मिळते. ताजे व सुकविलेले अंजीर यामुळे पोट साफ न होणे, मलरोध होणेचा त्रास आटोक्यात येतो.
* रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात लाभकारी आहे.
* शरीरातील उष्णता कमी करण्यास व रक्तशुद्ध करण्यासाठी अंजीर खाणे योग्य आहे ते पिकलेले असल्यास अधिक चांगले, अंजीर हे थंड असल्याने पोटातील उष्णता बर्यापैकी कमी करते.
* रोज ताजे अंजीर खाल्याने जे रात्रपाळी, धूम्रपान, चहाचा जास्त प्रमाणात घेणे, दारु चे व्यसन यामुळे शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होत असते. शरीराची हे नुकसान भरणेसाठी ताजे अंजीर खाने अतिशय योग्य आहे.
* यात असलेले औषधिगुणामुळे पित्ताचे विकार, वात विकार, रक्ताचे विकार हे आजार आपल्यापासून दूर होतात.
* यात ओमेगा थ्री व ओमेगा सीक्स घटक मुबलक प्रमाणात असल्याने ह्दयाचे आजार कमी प्रमाणात होवून आजार आटोक्यात येण्यास मदत होते.
* पायांना भेगा असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावणे योग्य आहे त्यामुळे भेगा लवकर भरून निघतात.
* आजारपणातून उठल्यावर अशक्तपणाची जाणीव होत असते अंजीर 7 दिवस खाल्याने कमी होऊन शरीरास शक्ती मिळते.
* यामध्ये कॅल्शियम असल्याने हाडे मजबत होतात. अंजीरामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना सांधेदुखी किंवा ओस्टीयोपोरोसीस सारख्या हाडांशी निगडीत व्याधी आहेत, त्यांनी अंजीराचे नियमित सेवन करावे. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन कमकुवत होण्याच्या प्रक्रीयेला अवरोध निर्माण होईल.
* पोटॅशियम असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
* रक्तदाबाच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अंजीर खाणे फायदेचे आहे.
*शरीरामध्ये क्षाराची कमतरता असते, नियमितपणे सेवनाने नियंत्रणात येते.
* ताजे अंजीर सालीसकट खाणेमुळे फायदा होतो. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. झोपणे आधी 2 अंजीर खाणे अधिक फायद्याचे.
* पाने गुणकारी असतात. ती पाण्यामध्ये उकळून घेऊन ते प्यायल्याने शरीरातील मोठ्या प्रमाणात चरबी साठवीली जाते त्याचे नियंत्रित होणे सहज सोपे होते. यामुळे लठ्ठपणा व हृदयरोग या व्याधी होण्याचे टाळता येते.* पचनशक्ती चांगली राहण्यास, पोट अधिक काळ भरलेले राहून भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल.
* अमेरिकन लेखानुसार तंतुमय पदार्थ सेवन केल्यास चांगले आरोग्य व वजन कमी करण्यास मदत होते. सुक्या अंजिरात उष्मांकपण जास्त असल्याने शरीरास लाभदायक सिद्ध होते.
* अंजीरे दुधात भिजवून खावी त्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते.
* महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होणे टाळता येते.
* डांग्या खोकला व दम्याचे आजारावर गुणकारी.
* यकृताचे कार्य सुरळीत होवून पोटाचे विकार, अपचन व बध्दकोष्ठ सारखे आजार दुर होतात.
* रक्त शुद्ध करणे तसेच रक्तातील शर्करेची मात्रा नियंत्रित करतो.
* पोट्याशियम तत्वयुक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात ग्लुकोज आणि शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
यामुळे मधुमेहापासून बचाव होतो.
अति सेवन टाळावे -
* अंजिराचे सेवन संयमित करणे महत्वाचे आहे. नाहीतर पचनसंस्थेतून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
* सुकी अंजीर जास्त खाल्ल्यास दातांच्या किडण्याचे कारण बनु शकते.
* एलर्जी असेल त्यांनी अंजीर खावू नये.
**आपले फॅमिली डॉक्टर किंवा वैद्यकिय मार्गदर्शन घेवूनच कोणताही पदार्थ किंवा फळे आहारात समावेश करावे.







Nice information.
ReplyDeletev good
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteNice blog sir keep it up ☺️👍👍👍
ReplyDeletebest information bro
ReplyDeleteGood job sir
ReplyDeleteLike post
ReplyDeleteLike
ReplyDelete