शिक्षक दिन हा आपल्या भारत देशात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून उत्साहात आणि शिक्षकांना आदर देवून साजरा केला जातो
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असते, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सर्व मान्यवर शिक्षकांचे आदर्श, थोर शिक्षणतज्ञ, कुशल वक्ते, मानवतावादी विचारवंत, सिध्दहस्त लेखक, राजकारण, समाजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक तसेच भारताची प्रतिमा विदेशात उंचावरणारे महान तत्वचिंतक होते, त्यांना शिक्षकांविषयी प्रचंड आदर होते. त्यामुळे त्यांचा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे भविष्यातील नवी पिढीचा शिल्पकार असतो त्यामुळे त्यांनी घडविलेले व त्यांच्याकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जगाकडे व समाजात वावरण्याची सकारात्मक दृष्टी प्राप्त होते. आपल्याला समाजात वावरण्याचे ज्या आदरणिय शिक्षकांनी घडविले त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच शिक्षक दिन होय.
गुरुजी हेच येणारे पिढींचे शिल्पकार आहेत. भारतीय संस्कृती ही आदर्श संस्काराची शिदोरी आहे. यामध्ये गुरुंचा सन्मान अग्रभागी आहे. म्हणूनच गुरुला देवाची उपमा दिली जाते. कारण ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तशी गुरुने ज्ञानाची निर्मिती केली आहे. शिक्षक हा समाजाचा निर्माणकर्ता आहे असे आपण मानतो. विद्यार्थ्यांना देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षक करतात...
`शिक्षक` हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा `शिक्षक दिन` म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सुध्दा विद्यार्थ्यांमध्ये रमणे आवडायचे कारण त्यांच्याकडून येणाऱ्या कल्पना, त्यांची जिद्द विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असे. आणि म्हणूनच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी येणारा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री शिक्षकांविषयी भूमिका मांडताना सांगतात की, चिखलाच्या गोळ्याला आकार आणि रुप देणाऱ्या सर्जनशील हातांप्रमाणे शिक्षक मुलांना आकार देतात. राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक मंडळी करत असतात. शिक्षक दिवस आपल्या सर्व शिक्षकमंडळींचा सन्मान करण्याकरीता आहे. आज सर्व पालक आपल्या पाल्यांना जरी चांगले शिकवण व वागणूक देत असले तरी पण शिक्षक हा संपूर्ण समाजाचा पालकच असतो. आपल्या आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व असल्यामुळे शिक्षणाच्या जोरावरच आपल्याला आधुनिक प्रगती करता येते.
सर्वांच्या आई वडीलांची किंवा पालकाची इच्छा असते आपला पाल्य शिकावीत आणि मोठी व्हावीत त्यांनी प्रगतीच्या उंच शिखर प्राप्त करावे. पण आजच्या शिक्षकाने माणूस घडवणारे शिक्षण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांला शिक्षणातून काय साध्य करावयाचे हे निकष निश्चित समजले तरच शिक्षण साध्य होईल. आजचे युग पाहता, शिक्षकांकडे भरमसाठ माहितीचा कोठा असणे, अपडेट, जगासोबत अनेक आवश्यक बदल असणे आवश्यक आहे. शिक्षक एक विद्यार्थी नाही तर समाज घडवत असतो, म्हणूनच शिक्षकाला समाजात असामान्य महत्त्व आहे. गुरु शिष्याच्या नात्याला महत्त्व आहे.
शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम व विकासाचा मंत्र आहेत. यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची व मोलाची असते. सध्या सर्व बाजुंनी माहितीचे प्रचंड स्फोट होत असतांना दिसते. नवनवीन इतिहास घडत आहे. भौगोलिक बदल, वैज्ञानिक शोध, थोडक्यात सांगायचे सामाजिक ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक असे परिवर्तन जागतिक पातळीवरच होताना दिसते. ही माहिती शिक्षकाने वेळावेळी करून घेणे गरजेचे आहे. पहिला विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यात खूप अंतर दिसून येतो. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षक जे सांगेल तेच खरे ज्ञान अशी अवस्था होती. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम आई, वडील, शिक्षक करीत असत.
आजच्या आधुनिका युगात विद्यार्थ्यांच्या मनाची पाटी कोरी नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सोशलमिडीया, टिव्ही, संगणक, नव नवीन मोबाईल, टॅब, इंटरनेट आणि भोवतालचा परिसर यातून विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती गोळा करतेो. त्यामुळेच शिक्षकाचे कार्य आज खरोखरच कठीण होत चालले आहे. एखादी नवीन निर्मिती करणे जितके सोपे; तितके जुन्याची मोडतोड करून चांगले काही बनवणे अवघड असते.
विद्यार्थ्याला माहीती नसते, ते माहिती करुन देणे म्हणजेच शिक्षण नव्हे, तर त्याच्या माहितीचा तो कसा उपयोग करून घेवू शकतो याचे मार्गदर्शन करणे, योग्य मार्गाने आचरण करायला लावणे म्हणजेच शिक्षण. शिक्षक केवळ वर्गात शिकविणारी, अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती न राहता विद्यार्थ्यांच्या व्यकिमत्त्वाच्या विकासाला मदत करणारी, जबाबदार व्यक्ती तयार होईल तेव्हाच तो उत्कृष्ट शिक्षक ठरेल.


