संगणक/कम्प्युटर मध्ये करीअर कसे करावे

संगणक / कम्प्युटर मध्ये करीअर कसे करावे

चार्ल्स बॅबेज यांनी सन 1822 मध्ये पहिला संगणक बनविला. याची निर्मिती फक्त आकडे मोड करण्यासाठी होत असे. नंतर त्यात बरेच शोध लागले, बदलही घडून झाले. 1975 वर्षी पहिला पोर्टेबेल संगणक  बनविण्यात आले. आज जो आपल्या डोळ्यासमोर जो आपण पाहतो तो कम्प्युटर टॅब आणि मोबाईलमध्येही वापरता येऊ शकतो. छोट्या स्वरूपात आणि जास्तीत जास्त वापरात असलेला आहे. सध्या मोबाईल जशी काळाची गरज. तसेच कम्प्युटरची तशीच गजर भासते. यासाठी मोठ्या प्रमाणात संगणकात बदल घडून आले आणि कम्प्युटरशी संबंधित व त्यावर अवलंबून असलेले कंपन्या व विविध क्षेत्र जलद गतीने विकसीत होत आहे. 

माहितीचे देवाण-घेवाण करणे, त्या माहितीचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी कम्प्युटरचा वापर होवू लागला आहे. थोड्या शब्दात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारुन, आपण दिलेल्या सूचनांचे प्रक्रिया करून नेमके उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आहे. आज सर्व खाजगी कंपन्यांपासून ते शासकीय कार्यालयांपर्यंत कागदोपत्री ऐवजी पेपरलेस वर्क करण्याचा प्रयत्न सुरू झाले असून, संगणकाचे वापराचे प्रमाण वाढत आहे. संगणक क्षेत्रात करियरच्या संधीही तेवढ्याच वाढत आहेत. 


सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनिअरींग 
असे दोन शाखा असतात. 
दोन्ही क्षेत्राशी संबंधित शिक्षणक्रम, 
फि, कालावधी त्या संदर्भात माहिती पुढिल प्रमाणे - 



डिप्लोमा इन कम्प्युटर अप्लीकेशन 
- 2 वर्षाचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम 
- फि अंदाजे 40 ते 50 हजार
- सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बीसीए.
- 3 वर्षाचा शिक्षणक्रम
- 12 वी उत्तीर्ण
- कोर्स झाल्यास 1.5 लाख ते 3.5 लाख वर्षाचे पॅकेज कोणत्याही फेमस
कंपनी देवू शकते.

डिप्लोमा इन कम्प्युटरायझींग ॲण्ड डाटा प्रोसेसिंग ॲण्ड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम 
- मुंबई विद्यापीठाचा दोन वर्षाचा पदविका शिक्षणक्रम

बीएसस्सी. हार्डवेअर ॲण्ड नेटवर्कींग -
- 3 वर्षाचा पदवी शिक्षणक्रम
- 12 वी उत्तीर्ण
- कम्प्युटर आर्कीटेक्चर नंबर सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम, इन्स्टॉलेशन
ॲण्ड युटीलिटी, स्ट्रक्चर ऑफ प्रोग्रामींग, फंडामेंटल ऑफ कम्प्युटर
ॲण्ड बेसिक इलेक्ट्रॉनिक्स विषयांचा अभ्यासक्रम.

बीसीए. इन गेम सॉफ्टवेअर ॲण्ड डेव्हलपमेंट 
- 3 तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम
- मॅथ्स आणि फिजीक्ससह 12 वी विज्ञान उत्तीर्ण
- जावा प्रोग्रामींग, गेम डिझाईनिंग, प्रोग्रामींग युजींग++, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग, मल्टिप्लेअर प्रोग्रामींग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट विषय अभ्यासक्रम.
- फि 3.5 लाख
- एशियानेट न्युज, सीएनएन आयबीएन, ग्लोबल डीजे, रिलायन्स मिडीया वर्क नामांकित कंपन्यांमध्ये काम मिळू शकते.

बीबीए इन कम्प्युटर अप्लीकेशन - 
- 3 वर्षाचा शिक्षणक्रम
-12 वीमध्ये किमान 40 टक्के
- एलिमेंट ऑफ स्टॅटिस्टीक, बिझनेस कम्युनिकेशन, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग, व्हीज्युअल बेसिक, कोरल जावा, मल्टिमिडीया सिस्टम विषयांचा अभ्यासक्रम.
- अंदाजे फि 1 लाख

सॉफ्टवेअर आणि हाडॅवेअर संबंधि कोर्स पूर्ण केले परंतू जॉब मिळाला नाहीतर तुम्ही स्वत:चे व्यावसायही सुरू करू शकता. ऑनलाईन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट, ऑनलाईन घरी बसूनही पूर्ण करू शकतात. प्रामणिकपणे व वेळेत काम पुर्ण केल्यास जागतिक बाजारात अनेक संधी उपलब्ध होतात. जगातील इतर देशांपेक्षा भारतातील सेवा शुल्क कमी असल्याने या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रोजेक्ट किंवा कामाच्या अधिक संधी उपलब्ध आहे. हार्डवेअर क्षेत्रात स्वत:चे उद्योग सुरू करता येते. शाळेतही पूर्णत: डिजीटलाझेशन होत आहे आणि विद्यार्थीही संगणकावर व मोबाईल व्दारेच अभ्यास करत आहे. या क्षेत्रात अजुन ही भविष्यात करियरच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!