जागतिक वृक्ष दिन


आपले ग्रह हे हरित ग्रह आहे संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान ३३ टक्के जमीन झाडांच्या छायेत असणे गरजेचे आहे. मानवाने प्रदूषणाला आळा घालणे आवश्यक आहे परंतु, हे काम अप्रत्यक्षपणे वृक्ष अतिशय प्रभावीपणे करू शकतात. या बाबतची जाणीव करून देऊन वृक्ष- संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

स्वत:ची गरज नव्हे, तर चैन पुरवण्यासाठी जंगलतोड करणा-या माणसांमुळे आता सर्वच जीवचक्रांचे आणि साखळ्यांचे संतुलन बिघडले आहे.

उदा. दर काही महिन्यांनी घरातील फर्निचर बदलणा-यांची हौस भागविण्यासाठी ब्राझीलसारख्या अनेक देशांतील अनेक मोठे वृक्ष तोडले जातात.हे थांबवण्याबरोबरच अधिक झाडे लावणेदेखील सर्वांच्याच जीवनासाठी आवश्यक आहे. याबाबतीत आपणच आपल्या पातळीवर योगदान द्यायला हवे. 

त्यासाठी स्थानिक जातींच्या झाडांची लागवड करणे, एखादे तरी झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणे असे उपाय करता येतील. शिवाय अनेकदा समाजकंटकांकडून वृक्षतोड होत असते, तेव्हा राष्ट्रीय हरित लवाद, स्थानिक वृक्ष प्राधिकरण अशांसारख्या निमसरकारी विभागांना, सामाजिक संस्थांना किंवा वृत्तपत्रांना आपण थेट कळवून गुन्हेगारांवर कारवाई करू शकता. 

विविध सरकारे, संस्था आणि व्यक्तींव्दारे जगात वृक्षारोपण केले जात असतेच या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक जागतिक स्वरूप देण्यासाठी जागतिक वृक्ष दिन- २७ सप्टेंबर - ‘वर्ल्ड ट्री डे’ ही संकल्पना राबवली जाते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!